शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : एकदा कोरोनातून बरे झाले, तरी पुढे काळजी घ्यावीच का ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 05:19 IST

तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत.

सध्या कोरोना संसर्गातून अनेक जण बरे होत आहेत. यांपैकी अनेकांचा गैरसमज आहे, की मला कोरोना होऊन गेला आहे, आता मला काही काळजी घेण्याचे कारण नाही. पण तुम्ही कोरोनामधून बरे झालेले असाल तरी तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हात धुणे, सॅनिटायजरचा वापर तसेच कोरोना होण्याअगोदर घेत होतो तशीच सर्व काळजी घेणे चालू ठेवावे लागणार आहे. याची कारण पुढीलप्रमाणे आहेत.तुम्ही कोरोना संसर्गातून बरे झाले तरी तुम्हाला परत कोरोनाचा जो संसर्ग होऊ शकतो, त्यातून तुम्हाला फारसा धोका नाही; कारण काही प्रमाणात तुमच्या शरीरात आधीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. पण असे असले तरी तुम्ही त्या संसर्गाचे वाहक ठरून इतरांना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबाला संसर्गित करू शकता.तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली तरी तुम्हाला परत काहीही लक्षणे येणारच नाहीत असे नाही. तुम्हाला गंभीर स्वरूपाचा जीवघेणा कोरोना परत होणार नसला तरी तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा नक्कीच असू शकतो. म्हणजे आठवडाभर ताप, सर्दी, खोकला, थकवा असे होऊ शकते. जरी जिवाला धोका नसला तरी याने कामाचे तास बुडतील, परत १४ दिवस विलगीकरण असा अनावश्यक त्रास होईल. जर काळजी घेणे सुरु ठेवले तर हा त्रास टळू शकेल.एकदा कोरोना होऊन गेला तरी तो नेमक्या कुठल्या स्ट्रेनमुळे झाला हे माहीत नसते. सध्या कोविड-१९ च्या एक्स आणि वाय अशा दोन स्ट्रेन देशात आहेत. या राज्यांतर्गत वेगळ्या आहेत की अगदी राज्यातच जिल्ह्यांतर्गत आहेत, की अगदी एकाच तालुक्यातही दोन स्ट्रेनचा संसर्ग सुरु आहे हे अजून नीटसे माहीत नाही. पण देश व राज्य अंतर्गत प्रवास सुरू झाल्याने त्या इकडून तिकडे वाहून गेल्याच असणार. जर आधी एकाचा कोरोना होऊन गेला तर दुसऱ्या स्ट्रेनचा नंतर होऊ शकतो. या नवीन स्ट्रेनचा संसर्ग फ्रेश / नवा असल्याने त्याचा नक्कीच जिवाला धोका असू शकतो. म्हणजे एका स्ट्रेनने झालेला संसर्ग हा त्या स्ट्रेनसाठीच पुढच्या वेळी प्रतिकारशक्ती देईल, दुसºया स्ट्रेनसाठी नाही.या सर्व कारणांमुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांनी काळजी घेणे सुरू ठेवावे.- डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून,वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य