coronavirus: number of corona virus patients in the Maharashtra at 112 BKP | coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्थांची संख्या 112 वर, इस्लामपुरातीला एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण 

coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्थांची संख्या 112 वर, इस्लामपुरातीला एकाच कुटुंबातील 5 जणांना लागण 

मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज सांगलीतील इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्थांचा आकडा 112 वर पोहोचला आहे. तर देशातील कोरोनाग्रस्थांची संख्या 570 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या विचारात घेतल्यास महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. 

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 570 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी देशात 21  दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे.

Web Title: coronavirus: number of corona virus patients in the Maharashtra at 112 BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.