शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

CoronaVirus: “ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 1:10 PM

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील नीती आयोगाकडूनही ‘मुंबई मॉडेल’ ची दखल घेत कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे.

ठळक मुद्देनितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोपठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणामुंबईतील रुग्णांची नोंद पुणे, इतर शहरांत?

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील नीती आयोगाकडूनही ‘मुंबई मॉडेल’ ची दखल घेत कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. (coronavirus nitesh rane slams thackeray govt over mumbai model of corona management) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र,  महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. मात्र, देशभरात नावाजले जात असलेले ठाकरे सरकराचे मुंबई मॉडेल हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबईतील रुग्णांची नोंद पुणे, इतर शहरांत?

मुंबईतील कोरोना रुग्णांना पुणे आणि इतर शहरांमध्ये ट्रान्सफर करणे हेच ‘मुंबई मॉडेल’ आहे का? अनेक लोकांनी मला याबाबत सांगितले. मुंबईत एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली की, त्याला पुण्याच्या कोव्हिड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!

“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त दिसतो. फुल गोलमाल आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. 

“सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका

दरम्यान, सोमवरी राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ३७ हजार २३६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४४,६९,४२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७% एवढे झाले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे Politicsराजकारण