शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 03:01 IST

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असून या पार्श्वभूमीवर सध्यस्थितीत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंदच ठेवून घरून आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आॅनलाइन शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांइतकाच महत्त्वाचा घटक असणारे शिक्षक आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सेवा अनलॉक होताना आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळेत बोलवा, याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक केल्याने राज्यात व मुंबईत अनेक ठिकाणी शिक्षकांना संसर्ग होऊन ते मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत आॅनलाइन शिक्षण सुरू असताना विनाकारण शाळांमध्ये सर्व शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक न करता आवश्यक त्या सूचना शिक्षण विभागाने निर्गमित कराव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून जोर धरू लागली आहे.नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत.मात्र या परिस्थितीत प्रवासाची सुविधा नसताना कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, विरार, वसईसारख्या ठिकाणांहून येणाºया शिक्षकांमध्ये संक्रमण वाढत असल्याचे दिसून आले आहे.मागील काही आठवड्यांत मनपा खाजगी शाळांतील ६ ते ८ शिक्षकांना संसर्ग झाला असून, त्यातील काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. महिला शिक्षकांचे हाल; संसर्गाचा धोकायामध्ये महिला शिक्षकांचे हाल होत असून प्रवासादरम्यानही संसर्गाचा धोका असल्याने त्यांना जास्त भीती वाटत आहे. शाळा सुरू होईपर्यंत आॅनलाइन शिक्षण सुरू असताना आणि संसर्गाचा धोका वाढत असताना शिक्षकांवर उपस्थितीची जबरदस्ती का, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला. दरम्यान, अनेक ठिकाणी विनाकारण शाळेत बोलविण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असल्याने शाळा सुरू होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतरांना शाळेत बोलावू नका, अशी मागणी मुंबई प्रदेश भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षकांकडे केली आहे.कोरोनाचा संसर्ग पाहता सद्य:स्थितीत शाळा सुरू करण्याच्या कोणत्याही सूचना शिक्षण विभागाकडून नाहीत. मात्र आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळेत बोलावण्याच्या सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणेच शाळांनी कार्यवाही करावी. - विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण विभाग

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षण