CoronaVirus News : राज्यात ६ लाखांहून अधिक उपचाराधीन रुग्ण; ५८ हजार ९५२ रुग्ण, तर २७८ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:27 IST2021-04-15T01:26:42+5:302021-04-15T07:27:57+5:30
CoronaVirus News: राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे.

CoronaVirus News : राज्यात ६ लाखांहून अधिक उपचाराधीन रुग्ण; ५८ हजार ९५२ रुग्ण, तर २७८ मृत्यू
मुंबई : राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५ लाख ७८ हजार १६० वर गेला असून, बळींची संख्या ५८ हजार ८०४ झाली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला असून, सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २९ लाख ५ हजार ७२१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ टक्क्यांवर आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २७८ मृत्यूंत मुंबई ५४, ठाणे मनपा १४, नवी मुंबई मनपा ७, कल्याण डोंबिवली मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा १, नाशिक १२, नाशिक मनपा १२, अहमदनगर १०, अहमदनगर मनपा १९, जळगाव १, जळगाव मनपा ८, नंदुरबार १, पुणे २, पिंपरी चिंचवड मनपा ४, सोलापूर १, सोलापूर मनपा ३, सातारा १, कोल्हापूर १, सांगली १, सिंधुदुर्ग ३, रत्नागिरी १, औरंगाबाद मनपा २, जालना १, परभणी २, परभणी मनपा १, लातूर ५, लातूर मनपा १, उस्मानाबाद ११, बीड ८, नांदेड ८, नांदेड मनपा १३, अकोला २, अकोला मनपा ८, अमरावती ५, अमरावती मनपा १, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर ५, नागपूर मनपा १९, भंडारा १, गोंदिया ५, चंद्रपूर ४ इ. रुग्णांचा समावेश आहे.
देशाच्या तुलनेत राज्याचा मृत्यूदर अधिक
- एकूण रुग्णसंख्येत ६१ टक्के पुरुष, तर ३९ टक्के महिला रुग्ण.
- उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी ९२ टक्के रुग्ण लक्षणेविरहित व सौम्य लक्षणे असलेले.
- अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणारे ५ टक्के रुग्ण.
- सक्रिय रुग्णसंख्येपैकी ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत.