शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 20:16 IST

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीसने शनिवारी एक अहवाल जारी केला. आतापर्यंत राज्यात तब्बल 18 हजार 890 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.3 हजार 729 जणांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाउन शिथील केल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. येथे आतापर्यंत 10 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका, सर्व सामान्य जनतेच्या सेवेत असलेल्या पोलिसांना आहे. 

महाराष्ट्र पोलीसने शनिवारी एक अहवाल जारी केला. यानुसार, आतापर्यंत राज्यात तब्बल 18 हजार 890 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, यांपैकी 14 हजार 975 कर्मचारी बरेही झाले आहेत. 3 हजार 729 जणांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोना व्हायरसमुळे 186 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 46.50 लाखांवर -गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,570 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यानंतर आता शनिवारी एकून कोरोना संक्रमितांचा आकडा वाढून तब्बल 46 लाखांवर गेला आहे. तर आतापर्यंत 36,24,196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरना रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशातील कोरना संक्रमितांचा आकडा 46,59,984 वर पोहोचला आहे. तर, गेल्या 24 तासांत 1,201 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत तब्बल 77,472 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील लॉकडाउन संपल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जगभरातील नव्या रुग्णांचा विचार करता, भारतातच सर्वाधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. एकूण कोरोना संक्रमितांच्या संख्येचा विचार करता भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. तसेच अमेरिका आणि भारतातील संख्येतील तफावतही सातत्याने कमी होताना दिसत आहे.

सुट्टीच्या नियमांत बदल, मुंबईतील डॉक्टर्सनी दर्शवला विरोध -कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या मुंबईतील निवासी डॉक्टरांनी सुट्टीच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलांना विरोध दर्शवला आहे. या डॉक्टरांनी शनिवारी काळी पट्टी लाऊन काम करायला सुरुवात केली आहे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना आठवड्यातून एक दिवसच सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. 

भारत अमेरिकेला महिनाभरात मागे टाकणार?आता भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. या साथीचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर भारत आला आहे. अमेरिका आणि भारताच्या रुग्णसंख्येत २० लाखांचा फरक आहे. भारतात याच वेगाने कोरोना रुग्ण वाढत राहिले, तर 20 दिवस ते महिनाभरात अमेरिकेला मागे टाकत, भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचा देश बनेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या देशात 9,43,480 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 20.68 टक्के आहे. सलग दोन दिवस कोरोनाचे 95 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर