CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:09 PM2020-05-04T13:09:06+5:302020-05-04T13:09:32+5:30

सर्वाधिक १४ हजार गुन्हे पुण्यात 

CoronaVirus News 92 thousand cases have been registered in state regarding covid 19 | CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

CoronaVirus News: कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९२ हजार गुन्हे दाखल

Next

मुंबई -  लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते ३ मे  या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२,१६१ गुन्हे दाखल झाले असून १८,२१६ व्यक्तींना अटक करण्यात आली.आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात ( १४,७५२) झाली असून  सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (७२) , रत्नागिरी (७५) जिल्ह्यात आहे.

या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची  माहिती पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आली. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलिसांच्या १०० नंबर वर ८३,२९९ फोन आले, त्याची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६३३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. 

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२५५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५१,८७४ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७५ घटनांची नोंद  झाली असून  यात ६५९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने  काही अधिकारी व  कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले.सध्या ३५पोलीस अधिकारी व ३५० पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.

Web Title: CoronaVirus News 92 thousand cases have been registered in state regarding covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.