तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 09:09 AM2021-09-09T09:09:25+5:302021-09-09T09:10:18+5:30

coronavirus : राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे.

coronavirus mumbai reports 532 covid cases highest since july 15  | तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

तिसऱ्या लाटेचा इशारा; मुंबईत 1 दिवसात कोरोनाचे 532 रुग्ण, 15 जुलैनंतर सर्वात मोठी आकडेवारी

googlenewsNext

मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेबाबत चिंता वाढत आहे. बुधवारी मुंबईत नवीन कोरोना रुग्णांची संख्या 532 नोंदवण्यात आली. जुलैनंतर नवीन प्रकरणांमध्ये ही सर्वात मोठी वाढ आहे. यापूर्वी 15 जुलैला 528 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. दुसरीकडे, राज्यात बुधवारी  कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 4,174 नोंदवली गेली, तर 65 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या 64,97,872 झाली आहे आणि मृतांची संख्या 1,37,962 वर पोहोचली आहे.

मुंबईत जवळपास दोन महिन्यांनंतर केवळ नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, येथील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. पॉझिटिव्हिटी रेट आता 0.9 वरून 1.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हा दर 0.5-0.7% दरम्यान होता. आता मुंबईत गेल्या 7 दिवसांत सरासरी रुग्णांचा आकडा 434 वर गेला आहे. तर 18 ऑगस्टला हा आकडा फक्त 253 होता. मुंबईत तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याचे हे आकडे इशारा करत आहेत.

रुग्णसंख्या वाढण्याचे काय कारण?
गेल्या दोन महिन्यांत मुंबईत लोकल सुरु करण्यात आली आहेत. याशिवाय, येथे काही शाळा देखील उघडल्या आहेत. अधिकाऱ्यांनी कोणतेही नवीन निर्बंध त्वरित मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांनी सांगितले की, कोरोना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच, स्थानिक अधिकाऱ्यांना विशेषतः गणेश चतुर्थी उत्सवाच्या वेळी गर्दी थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोना चाचण्यांमध्ये घट?
आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळासमोर कोरोनाच्या परिस्थितीवर एक प्रझेंटेशन दिले. या दरम्यान ते म्हणाले की, दैनंदिन प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, परंतु चाचण्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. याआधी राज्यात दररोज दोन मिलियनहून अधिक चाचण्या होत होत्या, त्या आता कमी होऊन दररोज 1.7 मिलियन झाल्या आहेत. म्हणजेच सक्रिय प्रकरणे आज आपण पाहत आहोत, त्यापेक्षा अधिक असू शकतात.

लसीकरणावर भर
डॉ. प्रदीप व्यास यांनी इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सला सांगितले, 'कोविड -19 साथीच्या विरूद्ध आमची लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि रेकॉर्ड करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्व प्रयत्न करत आहे. 4 सप्टेंबर रोजी आम्ही 1,227,224 डोसचे लसीकरण केले आणि 21 ऑगस्ट रोजी 1,104,465 डोसचे लसीकरण केले.

गणेशोत्सवात सतर्कता
महाराष्ट्र सरकारने बुधवारी म्हटले आहे की, कोविड महामारीमुळे लोकांना गणेशोत्सवाच्यावेळी मंडपात प्रवेश दिला जाणार नाही. राज्याच्या गृह खात्याकडून सांगण्यात आले की, मंडपामधून केवळ ऑनलाइन दर्शनाला परवानगी असेल. यापूर्वी, गृह विभागाने एका आदेशात म्हटले होते की सणादरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे.

Read in English

Web Title: coronavirus mumbai reports 532 covid cases highest since july 15 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.