शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

CoronaVirus News : दिलासादायक! राज्यातील तब्बल 15,62,342 लोकांनी केली कोरोनावर मात, रिकव्हरी रेट 91.35 टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 9:40 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यात आज 5027 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व 11,060 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 15,62,342 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहेत. रुग्णांच्या संख्येने  लाखांचा 84 टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,24,985 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यातही कोरोनाग्रस्तांच्या संख्या तब्बल 17 लाखांवर पोहोचली आहे. राज्यात आज 5027 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व 11,060 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 15,62,342 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील तब्बल 15,62,342 लोकांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट 91.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात एकूण 1,02,099 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी (6 नोव्हेंबर) कोरोनाचे 5027 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 161 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 17,10,314 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 44 हजारांवर पोहोचला आहे. 

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होतेय वाढ

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 15,62,342 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून ते 91.35 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला! 4 पैकी 3 विद्यार्थी पॉझिटिव्ह; रिपोर्टने वाढवली पालकांची चिंता

वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं. शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 4 पैकी 3 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहेत.

दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयाने कोरोना संदर्भात दिलेल्या एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे. गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या गाईडलाइन्सनुसार देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. ही मुले सहजपणे दुसर्‍या मुलास संक्रमित करतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र