CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 08:49 PM2020-10-02T20:49:08+5:302020-10-02T20:51:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 14,16,513 | CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त

CoronaVirus News : दिलासादायक! राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोनामुक्त

Next

मुंबई - राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


आज निदान झालेले १५,५९१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४४० (४२), ठाणे- २७० (३), ठाणे मनपा-३५८ (२), नवी  मुंबई मनपा-३८८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३२१ (१), उल्हासनगर मनपा-४६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-४७ (२), मीरा भाईंदर मनपा-२४० (१), पालघर-१५९ (४), वसई-विरार मनपा-१४५ (६), रायगड-२६२ (३), पनवेल मनपा-२६१ (), नाशिक-२३९ (१३), नाशिक मनपा-६९२ (११), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-५१० (३), अहमदनगर मनपा-११० (१), धुळे-४३ (१), धुळे मनपा-४३ (१), जळगाव-१७५ (४), जळगाव मनपा-१७३ (१), नंदूरबार-३८ (१), पुणे- ८९६ (२०), पुणे मनपा-१०४३ (१८), पिंपरी चिंचवड मनपा-५९९ (८), सोलापूर-२९१ (१५), सोलापूर मनपा-६३ (५), सातारा-७५७ (४२), कोल्हापूर-२४९ (५), कोल्हापूर मनपा-६४ (२), सांगली-३८४ (१५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१३९ (५), सिंधुदूर्ग-६७ (४), रत्नागिरी-११६ (४), औरंगाबाद-१२० (०),औरंगाबाद मनपा-२७८ (१), जालना-३५, हिंगोली-३३ (३), परभणी-३९, परभणी मनपा-२७ (१), लातूर-१३७ (४), लातूर मनपा-९४ (२), उस्मानाबाद-१६० (८), बीड-२१३ (४), नांदेड-८० (१), नांदेड मनपा-४९ (२), अकोला-४२ (१), अकोला मनपा-४८, अमरावती-८४, अमरावती मनपा-१२९, यवतमाळ-८१ (५), बुलढाणा-२४६ (१), वाशिम-११०, नागपूर-३५४ (११), नागपूर मनपा-६४६ (१८), वर्धा-१४९ (३), भंडारा-१४६ (७), गोंदिया-९४ (२), चंद्रपूर-१३० (१), चंद्रपूर मनपा-१५४ (३), गडचिरोली-१४३, इतर राज्य-२७ (२).

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 14,16,513

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app