शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

CoronaVirus News: तसे कोणतेही आदेश आलेले नाहीत; गृहमंत्र्यांनी फेटाळला रेल्वेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 09:52 IST

CoronaVirus marathi News मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका; राज्य सरकारचं रेल्वेला आवाहन

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात लाखो मजूर अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पोहोचवण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या. मात्र या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेत असल्याची माहिती पुढे येताच राजकारण तापलं. रोजगार गमावलेल्या, संकटात सापडलेल्या मजुरांकडून पैसे कसले घेता, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करताच तिकीट दरात ८५ टक्के सलवत दिली जात असल्याची माहिती दिली गेली. उर्वरित १५ टक्के रक्कमदेखील संबंधित राज्य सरकारांकडून घेत असल्याचं रेल्वेनं सांगितलं. मात्र रेल्वेनं असे कोणतेही आदेश काढले नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. मुंबईत अशा कामगारांची संख्या फार मोठी आहे. त्या सर्वांना आपापल्या राज्यात जायचं आहे. काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातमी होती की, केंद्रातल्या रेल्वे खात्याच्या माध्यमातून तिकिटांवर ८५ टक्क्यांची सवलत परप्रांतीय कामगारांना देण्यात आली आहे. पण आजच्या तारखेपर्यंत असे कोणतेही आदेश रेल्वे विभागानं काढलेले नाहीत. त्यामुळे आज जे सर्व परप्रांतीय आपापल्या राज्यात चालले आहेत, त्यांना स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून तिकीट काढावं लागतं आहे. आज परप्रांतीय कामगारांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत,' असं देशमुख म्हणाले. आपल्या गावी परतणाऱ्या कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नये अशी विनंती मी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाच्या माध्यमातून करतो, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

काय होता रेल्वेचा दावा?रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नाहीयेत. रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं. 'भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,' असंदेखील रेल्वेकडून सांगण्यात आलं.

पत्र समोर आल्यानं रेल्वेची गोचीमजुरांच्या तिकीट खर्चावरुन राजकीय वाद निर्माण झाला असताना रेल्वेचं एक पत्र समोर आलं आहे. राज्य सरकारांनी मजुरांना रेल्वेची तिकीटं हस्तांतरित करावीत आणि तिकीट भाडं गोळा करून ते रेल्वेकडे जमा करावं, अशी सूचना रेल्वेच्या पत्रात आहे. या पत्रावर २ मे ही तारीख आहे. देशभरात अडकलेले प्रवासी मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचा उल्लेखदेखील या पत्रात आहे.ज्या राज्यांमध्ये विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत, त्या राज्यांनी मजुरांची यादी रेल्वेला द्यावी. त्याप्रमाणे रेल्वेकडून तिकीटं छापली जातील. त्यानंतर राज्य सरकारांना रेल्वेकडून तिकीटं दिली जातील. राज्य सरकारांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तिकीटं मजुरांना द्यावीत आणि त्यांच्याकडून आलेलं तिकीट भाडं रेल्वेकडे जमा करावं, असा मजकूर रेल्वेच्या पत्रात आहे.मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...तिकीट भाडं वसूल करून पैसे आम्हाला द्या; 'ते' पत्र समोर आल्यानं रेल्वेची गोचीघरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखIndian Railwayभारतीय रेल्वे