CoronaVirus News: मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:49 AM2020-05-04T11:49:52+5:302020-05-04T12:51:14+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका; रेल्वेकडून स्पष्टीकरण

CoronaVirus Marathi News no ticket is being sold to laborers says railways kkg | CoronaVirus News: मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...

CoronaVirus News: मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...

Next

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र अडचणीत असलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे आकारत असल्यानं विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. यानंतर आता रेल्वेनं याबद्दल महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नाहीयेत. रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं रेल्वेतील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,' अशी माहिती देण्यात आली आहे.




रेल्वे मजुरांकडून तिकीटाचे पैसे आकारत असल्याबद्दल विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. त्यावरुन रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं. 'रेल्वेला मजुरांच्या वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चापैकी केवळ १५ टक्के रक्कम राज्य सरकारांकडून घेतली जात आहे. रेल्वे मजुरांना कोणतीही तिकीटं विकत नाही. राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या यादीनुसार श्रमिक रेल्वेत मजुरांना प्रवेश दिला जातो,' असं रेल्वेनं म्हटलं आहे.







आतापर्यंत देशातल्या विविध भागांमधून ३४ श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रेल्वे सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. हा कठीण काळात देशातल्या गरिबातल्या गरिब व्यक्तींचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत, असं रेल्वेतल्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Web Title: CoronaVirus Marathi News no ticket is being sold to laborers says railways kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.