CoronaVirus News: धक्कादायक! महाराष्ट्रात तब्बल 3960 पोलीस कर्मचारी कोरना पॉझिटिव्ह, 46 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 07:04 PM2020-06-20T19:04:07+5:302020-06-20T19:22:02+5:30

एकट्या मुंबईत तब्बल 2,349 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका आठवड्यातच 9 पोलीसकर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

CoronaVirus Marathi News 3960 maharashtra police personnel corona positive 46 died | CoronaVirus News: धक्कादायक! महाराष्ट्रात तब्बल 3960 पोलीस कर्मचारी कोरना पॉझिटिव्ह, 46 जणांचा मृत्यू 

CoronaVirus News: धक्कादायक! महाराष्ट्रात तब्बल 3960 पोलीस कर्मचारी कोरना पॉझिटिव्ह, 46 जणांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील एकूण 986 पोलीस कर्मचारी अद्यापही संक्रमितकोरोनाच्या विळख्यात अडकलेले एकूण 2,925 पोलीस कर्मचारी आतापर्यंत ठणठणीत होऊन घरी परतले.एकट्या मुंबईत तब्बल 2,349 पोलीसांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई : देशातील महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, ज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे पोलीस कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार येथे आतापर्यंत एकूण 3960 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 46 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांपैकी एकूण 2,925 पोलीस कर्मचारी आतापर्यंत ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. यापैकी काही पोलीस कर्मचारी तर पुन्हा कामावरही रुजू झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 1 लाख 25 हजार कोरोना संक्रमित रुग्ण समोर आले आहे.  

एक बातमी वाचली अन् मोदींना 'आयडिया' सुचली, दिली तब्बल 50,000 कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी

राज्यातील एकूण 986 पोलीस कर्मचारी अद्यापही संक्रमित -
महाराष्ट्र पोलीसने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार,  राज्यातील एकूण 986 पोलीस कर्मचारी अद्यापही संक्रमित आहेत. यात तब्बल 113 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 873 शिपाई आहेत. तसेच ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांत एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे, तर 45 शिपाई आहेत.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

एकट्या मुंबईत तब्बल 2,349 पोलीसांना कोरोनाचा संसर्ग -
एकट्या मुंबईत तब्बल 2,349 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका आठवड्यातच 9 पोलीसकर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात 5893 जणांचा मृत्यू -
राज्यात शुक्रवारी रात्रीपर्यंत तब्बल 1 लाख 24 हजार 331 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर तब्बल 5,893 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच 5 लाख 91 हजार 49 लोक होम क्वारंटाईनमध्ये होते. तर 25 हजार 697 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होते. सध्या राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. 

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

राज्यात शुक्रवारी आढळले कोरोनाचे तब्बल 3,827 नवे रुग्ण -
राज्यात शुक्रवारी कोरोनाचे 3,827 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 142 जणांना मृत्यू झाला. मुंबईतील धारावीतही शुक्रवारी 17 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच बरोबर येथील कोरोनाबाधितांची संख्या आता 2,151 झाली आहे.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

 

Web Title: CoronaVirus Marathi News 3960 maharashtra police personnel corona positive 46 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.