coronavirus: आज राज्यात एका दिवसात तब्बल पाच हजार जणांनी केली कोरोनावर मात, कोविड-१९ विरोधातील लढाईला मोठं बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 08:16 PM2020-06-15T20:16:23+5:302020-06-15T20:17:27+5:30

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

coronavirus: As many as 5,000 patient defeated Coronavirus in a single day in Maharashtra | coronavirus: आज राज्यात एका दिवसात तब्बल पाच हजार जणांनी केली कोरोनावर मात, कोविड-१९ विरोधातील लढाईला मोठं बळ

coronavirus: आज राज्यात एका दिवसात तब्बल पाच हजार जणांनी केली कोरोनावर मात, कोविड-१९ विरोधातील लढाईला मोठं बळ

Next

 मुंबई -राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (आतापर्यंत एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (आतापर्यंत एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण ८११) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 

Web Title: coronavirus: As many as 5,000 patient defeated Coronavirus in a single day in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.