शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

CoronaVirus in Maharashtra: राज्यात दुसऱ्या लाटेत मृत्यूंच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 5:11 AM

राज्यातील ‘डबल म्युटंट स्ट्रेन’मुळे हा बदल झाला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू अधिक होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा परिणाम तरुणांवर अधिक होत असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाण्यात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४५ वयोगटापर्यंतच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे साधारणत: ५ ते ८ टक्के इतके असल्याचे राज्य मृत्यू परीक्षण समितीच्या अभ्यासात समोर आले आहे.

राज्य मृत्यू परीक्षण समितीच्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या मृत्यूंच्या विश्लेषणानुसार, मुंबईतील ४६० तर ठाण्यातील ३४० अशा एकूण ८०० मृत्यूंचा अभ्यास यात करण्यात आला. त्यात ४५ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे ५ ते ८ टक्के असल्याचे समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. यापूर्वी मागील वर्षातील कोरोना संक्रमणादरम्यान हे प्रमाण तीन टक्क्यांच्या आत होते.

राज्यातील ‘डबल म्युटंट स्ट्रेन’मुळे हा बदल झाला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू अधिक होते. यावेळी मात्र ४५ वयोगटातील व्यक्तींचे मृत्यू वाढले आहेत, असे डॉ. सुपे यांनी सांगितले. तरीही घाबरण्यासारखी परिस्थिती नसल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. नव्या स्ट्रेनमध्ये सुरुवातीचे पाच ते सात दिवस काही लक्षणे दिसत नाहीत. तो शरीरात आतल्या आत पसरतो. त्यानंतर तो अचानक आक्रमकपणे वाढत असल्याचेही डॉ. सुपे यांनी सांगितले.

४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रासइंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या ४७.५ टक्के रुग्णांना श्वसनाचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४१.७ टक्के इतके होते. यामुळे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याचेही सातत्याने दिसून येतेे.तरुणांमध्ये श्वसनाचा त्रास वाढलाnसेंटर इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हायलन्स प्रोगामच्या माहितीनुसार, मागील वर्षी ३१ टक्के तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तर यंदाच्या लाटेत हे प्रमाण ३२ टक्क्यांवर आले आहे. नवजात बालक ते ३९ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचे पहिल्या लाटेच्या तुलनेतील बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. नवजात बालक ते १९ वर्षांपर्यंतचे ५.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेत हे प्रमाण ४.२ टक्के इतके होते, तर २० ते ३९ वयोगटातील २५.५ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत, पहिल्या लाटेत हे प्रमाण २३.७ टक्के होते. nकोरोनाच्या दोन्ही लाटेत ज्येष्ठ नागरिकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे, तर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमधील ७० टक्के प्रमाण हे ४० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लक्षणविरहित असणारे मात्र श्वसनाचा त्रास असलेले अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या