CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:15 PM2021-04-10T21:15:43+5:302021-04-10T21:16:03+5:30

CoronaVirus in Maharashtra: राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण  बरे झाले आहेत. तर  309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे.

CoronaVirus in Maharashtra: 55,411 in the state, 9327 new corona in Mumbai; 309 deaths | CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू

CoronaVirus in Maharashtra: राज्यात 55,411, मुंबईत 9327 नवे कोरोनाबाधित; 309 मृत्यू

Next

राज्य मोठ्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची संख्या जाहीर झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर एकट्या मुंबईत आजचा आकडा हा 9327 एवढा आहे. (Maharashtra reports 55,411 new #COVID19 cases, 53,005 recoveries and 309 deaths in the last 24 hours)

Lockdown: थोडी कळ सोसा! लॉकडाऊनवर उद्या निर्णय, दोन दिवसांत रोड मॅप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संकेत


राज्यात आज दिवसभरात 53,005 रुग्ण  बरे झाले आहेत. तर  309 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 झाली आहे. तर मृतांचा आकडा 57,638 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 5,36,682 उपचार घेत आहेत. 

LockDown: मी आज निर्णय घेतला नाही तर...; लॉकडाऊनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा


तर मुंबईमध्ये 9327 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. 50 जणांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांचा आकडा 5,10,225 वर गेला आहे. पुणे शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने मागील शनिवारपासून कडक निर्बंध जाहीर केले आहे. दिवसा जमावबंदी तर सायंकाळी ६ नंतर कडक संचारबंदी लागू आहे. मात्र, आता त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांत ३६ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी होऊ लागला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. 


Web Title: CoronaVirus in Maharashtra: 55,411 in the state, 9327 new corona in Mumbai; 309 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.