शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

coronavirus: ई-पासच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 19:06 IST

केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.  

पुणे - केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.  इतर राज्यातील भौगिलिक व कोरोनाची परिस्थितीही वेगळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून ई-पासबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दाऊदच्या पाकिस्तानातील रहिवास असल्याचा मुद्दाही एकादृष्टीने महत्वाचा आहे़ आपल्या देशात वेगवेगळ्या अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोटमध्ये त्याचा हात आहे़ परंतु आता कोरोनाचे संकट आहे, याबाबतीत केंद्र सरकार व त्यांचे वरिष्ठ अधिकारी पुढील कार्यवाही करीत आहेत़  जम्बो हॉस्पिटल बंद झाल्यावर येथील सुविधा शासकीय रूग्णालयांतपरदेशात ज्या कंपन्या नावाजलेल्या आहेत अशा कंपन्यांकडून जम्बो हॉस्पिटलकरिता व्हेंटिलेटर बेड व अन्य सुविधा घेण्यात आल्या असून, जम्बो हॉस्पिटल बंद झाल्यावर या सर्व सुविधा आपण शासकीय रूग्णालय, ससून हॉस्पिटल, महापालिकेच्या रूग्णालयात तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. जम्बो हॉस्पिटलचा सहा महिन्यांसाठी करार करण्यात आला आहे़ पण यदाकदाचित काही घडले तर बेडची कमतरता पडू नये यासाठी सरकारला खबरदारी घ्यावी लागते, त्यानुसार या हॉस्पिटलची उभारणी केली आहे़ सध्या शिवाजीनगर, मगर मैदान व बाणेर येथे सीएसआर मधून असे एकूण १ हजार ८५० अधिकचे बेडसह खाजगी हॉस्पिटलमधील अधिकचे बेड उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे आजमितीला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बेड नाही अशी वेळ येत नसल्याचे म्हणाले. दरम्यान, पुण्याप्रमाणेच नाशिक, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याऐवजी, मंगल कार्यालयांची मोठी सभागृहे घेऊन तेथे कोविड रूग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ नाशिकमध्ये अशारितीने सेंटर उभे राहिले असल्याचेही पवार यांनी सांगितले़  पार्थ पवार विषयावर बोलणे टाळलेजम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हॉस्पिटल व अन्य सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली़ अखेरीस त्यांना पार्थ पवार यांच्या विषयी छेडले असता, ज्या विषयावर मी बोलणारच नाही त्या विषयावर विचारून काय उपयोग असे सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिकचे बोलणे टाळणेच पसंत करून पुढील कार्यक्रमाकडे गेले़ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार