Coronavirus: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

By प्रविण मरगळे | Published: February 26, 2021 04:24 PM2021-02-26T16:24:59+5:302021-02-26T18:40:03+5:30

SSC, HSC Exam, Minister Vijay Wadettiwar Statements on Corona Situations: अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे

Coronavirus: Important news for SSC-HSC students; Will you pass this year without exam? | Coronavirus: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

Coronavirus: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

Next
ठळक मुद्देया परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहेराज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाहीकाही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेऱ्या कमी करणेदहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग, शिक्षणमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई - राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवली आहे, अशातच आता शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शिक्षण विभागाचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार पर्यायी मार्गाचा विचार करणार असल्याचं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.( Looking at Corona's situation, passing 10th and 12th class students without examination? Minister Vijay Wadettiwar Statements)  

अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे, या परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे, परीक्षेवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे, महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले, टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाही, अशातच काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसमधील गर्दी कमी करणे, सिनेमागृह-विवाहस्थळे येथे होणाऱ्या गर्दीवर आळा घालणे यासारख्या गोष्टींवर विविध पर्याय शोधावे लागणार आहेत. येत्या काळात हे निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितले.

तामिळनाडूचा पॅटर्न महाराष्ट्र स्वीकारणार?

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी ९ वी ते ११ इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, कोरोनामुळे लेखी परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे २०२०-२१ या शालेय वर्षात विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पास करण्यात येईल अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तामिळनाडूत जे केलं तसेच महाराष्ट्रात होणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे – शिक्षणमंत्री

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचा कोणताही निर्णय झाला नाही, दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे असतात. विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे, कोरोनाचा धोका आणि परीक्षेचे टेन्शन हे यामुळे सगळं वातावरण चिंतेत आहे, दहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आवश्यक आहे, कारण या मुलांना पुढे अकरावी आणि इतर प्रोफेसनल कोर्ससाठी प्रवेश घ्यावा लागतो, त्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या आहे, परीक्षा रद्द केल्याचं कुठलंही वक्तव्य मी केले नाही असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे, त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

वाशिमच्या निवासी शाळेत आढळले २२९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

रिसोड तालुक्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील कोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली. शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

राज्यात कोरोनाचा कहर

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून, सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांवर नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात ८,७०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतही गुरुवारी  १ हजार १४५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला.  १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनावाढीचा दर ०.२५ टक्के इतका आहे. मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस आहे. मुंबईखालोखाल नागपूर, पुणे, पिंपरी, नाशिक, अकोला आणि औरंगाबाद या शहरांत प्रादुर्भाव वाढत आहे. अमरावतीत ९०६ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title: Coronavirus: Important news for SSC-HSC students; Will you pass this year without exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.