शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेलेल्या मुलाच्या हाती रुग्णालयाने सोपवला मृत्यू दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 08:14 IST

सर्वोपचार रुग्णालयातील प्रकार; सकाळी कर्मचाऱ्याने सांगितले होते वडिलांची प्नकृती ठीक

- प्रवीण खेतेअकोला : कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या वडिलांचा डबा घेऊन मुलगा रुग्णालयात जातो अन् त्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या मुलाच्या हाती चक्क मृत्यूचा दाखला देतात. हा धक्कादायक प्रकार अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात घडला आहे, सकाळीच जेवणाचा डबा दिला, तेव्हा वडिलांची तब्बेत ठीक असल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर रात्री हातात मृत्यूचा दाखला मिळाल्याने रुग्णाच्या मुलाला धक्काच बसला.बुलडाणा जिल्ह्यातील सातगाव म्हसला गावातील ७० वर्षीय विठ्ठलसिंह जाधव यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर बुलडाण्यातच उपचार सुरू करण्यात आले होते; परंतु डॉक्टरांनी एक्सरे काढल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय चाचणी अहवालात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने त्यांना कोविड वार्ड क्रमांक २९ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा संदीप होता. संदीप हे वडिलांसाठी दररोज जेवणाचा डबाही घेऊन जात होते.त्यांनी शनिवारी सकाळी वडिलांसाठी जेवणाचा डबा नेला. यावेळी कर्मचाºयाने वडिलांची प्नकृती ठीक असल्याचे सांगितले. त्याच दिवशी ते रात्रीचा डबा घेऊन गेले; मात्र त्यावेळी एका वैद्यकीय कर्मचाºयाने त्यांच्या हाती थेट मृत्यूचा दाखलाच दिला. त्यामुळे संदीप जाधव यांना धक्काच बसला.रुग्णाच्या नातेवाइकांसोबत संपर्क होत नाही, त्या रुग्णाचा मृतदेह शवगृहात सुरक्षित आहे. नियमानुसार, त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीतच अकोल्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाईल.- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या