CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 04:09 PM2020-03-29T16:09:35+5:302020-03-29T16:10:28+5:30

लॉकडाऊनमुळे नवीन रुग्णांची संख्या रोडावत चालली आहे. तर कोरोनाचे उपचार घेून बरे होत असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे.

CoronaVirus: Discharges reach 34 for corona positive people succesfully hrb | CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

Next

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुढील धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशच २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांनी त्यांच्या गावाकडे पायपीट सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५५ वर आली असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.


लॉकडाऊनमुळे नवीन रुग्णांची संख्या रोडावत चालली आहे. तर कोरोनाचे उपचार घेून बरे होत असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण १९६ रुग्ण सापडले होते. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37,नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01,औरंगाबाद 01,यवतमाळ 03, मिरज 25,सातारा 02,सिंधुदुर्ग 01,कोल्हापूर 01,जळगाव 01,बुलढाणा 01अशी आकडेवारी समोर आली होती.


तर यापैकी ३४ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईमध्ये ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: CoronaVirus: Discharges reach 34 for corona positive people succesfully hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.