शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus : दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 मुंबई : राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली, तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात साेमवारी दिवसभरात ३७ हजार ३२६ रुग्ण आणि ५४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.काही दिवसांपूर्वीच राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्याही पुढे गेले हाेती. दिवसभरात ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ रुग्ण उपचाऱाधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९६ लाख ३१हजार १२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या मुंबईत ४५ हजार ५३४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ८९१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १६ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.दिवसभरात मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ५१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ४६ रुग्ण पुरुष आणि २८ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते, तर ४४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत दिवसभरात २३ हजार ०६१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने आत्तापर्यंत चाचण्यांची संख्या ५७ लाख ३३ हजार ४३१ वर पोहोचली आहे. ३ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४१ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १६३ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झोन ८७ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ४९३ इतक्या आहेत.राज्यात एकूण ५१ लाख ३८ हजार ९७३ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ७६ हजार ३९८ आहे. शनिवारी आणि रविवारी कोरोना चाचण्या कमी झाल्याने वाढीचे नेमके प्रमाण किती आहे, हे येत्या एक -दोन दिवसात स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी