Coronavirus: राज्यात २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 02:22 IST2020-08-26T02:22:21+5:302020-08-26T02:22:44+5:30

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus: Coronavirus infects 351 policemen in 24 hours in the state | Coronavirus: राज्यात २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा

Coronavirus: राज्यात २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत तब्बल ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून तिघांचा मृत्यू झाला अराह. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १४२ वर पोहोचला आहे.

राज्यभरात आतापर्यंत १४ हजार ०६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी २ हजार ५६९ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ११ हजार ३५६ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोना झालेल्या ३४२ अधिकारी आणि २ हजार २२७ पोलिसांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १४२ पोलिसांना जीव गमवावा लागला असून यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे बंदोबस्तावर असताना पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. कोरोना काळात आतापर्यंत घडलेल्या अशा विविध हल्ल्यांमध्ये ८९ पोलीस जखमी झाले असून याप्रकरणी ८९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title: Coronavirus: Coronavirus infects 351 policemen in 24 hours in the state