CoronaVirus corona Patient in maharashtra is 416; 19 dead hrb | CoronaVirus राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४०० पार; आज सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

CoronaVirus राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४०० पार; आज सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमालीचा वाढू लागला आहे. बुधवारी काहीसा दिलासा मिळालेला असताना आज नव्या रुग्णांच्या संख्येने आधीचा आकडा पार केला आहे. यामुळे राज्य सरकारसमोरील संकटांमध्ये वाढ झाली आहे. 


महाराष्ट्रात आतापर्यंत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्याही ४०० पार झाली आहे. आज एकूण ८१ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ३३५ वरून थेट ४१६ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये पुण्यात६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, मुंबई ५७, नगर ९, ठाणे ५ आणि बुलढाण्यामध्ये १ रुग्ण सापडला आहे. तर गेल्या काही दिवसांत केवळ तीनच रुग्णांना डिस्चार् देण्यात आला आहे. राज्यात एकून बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

जिल्हा आणि त्यातील अधिसूचीत रुग्णालयाचे नाव कंसात खाटांची संख्या:
ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००),

रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००),

नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०),

अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०),

सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय  व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०),

नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०). अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००),वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००)

यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २३०५ खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.

Web Title: CoronaVirus corona Patient in maharashtra is 416; 19 dead hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.