शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंकडून फडणवीस, राणेंचा अप्रत्यक्षपणे 'विशेष' उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 9:39 PM

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांकडून मिशन बिगिन अगेनची घोषणा

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येणार असून आता लॉकडाऊन हा शब्दच केराच्या टोपलीत टाकायचा आहे असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. आता मिशन बिगिन अगेन सुरू होत असल्याची घोषणा ठाकरेंनी केली. आता आपल्याला हळूहळू पुढे जायचंय. एका नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये जनतेची साथ आवश्यक असल्याचं ठाकरे म्हणाले. आता सुरू केलेल्या सुविधा, सेवा पुन्हा बंद करायला लावू नका, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या टिपेला पोहोचली आहे. मात्र आपण बंधन पाळली तर ही संख्या कमी होईल. सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाच्या ६५ हजार केसेस आहेत. मात्र यातले २८ हजारच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. मात्र तरीही त्यांना ६५ हजारमध्ये धरलं जातं. सध्या उपचार घेत असलेल्यांपैकी १२०० जणांची प्रकृती गंभीर आहे. तर २०० जण व्हेंटिलेटरवर आहेत. मात्र याआधी व्हेंटिलेटर असलेले अनेक जण घरीदेखील परतले आहेत, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. भाजपाच्या काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आणि मुंबई लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. विरोधकांच्या या राजकारणावर मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'काही आपलीच माणसं राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा दु:ख होतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले.कोरोनाला रोखण्यासाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचीदेखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. 'पावसाळ्यात आजारांचं प्रमाण वाढतं. ते पाहता चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यासाठी केंद्रासोबत चर्चा सुरू आहे. लॅबची संख्या वाढवली जात आहे. जास्तीत जास्त जणांना ऑक्सिजन बेड्स लागतात. ती सोय आपण करत आहोत. गेल्या दोन महिन्यात उपचार, सुविधांवर आपण विशेष लक्ष दिलं आहे. आपला टास्क फोर्स अविश्रांत मेहनत करत आहे. मृत्यूदर खाली आणण्यात यश आलं आहे. तो आणखी खाली आणायचा आहे. काही रुग्ण शेवटच्या टप्प्यात दाखल होतात. त्यामुळे दुखणं अंगावर काढू नका. वेळेत या, उपचार घ्या आणि बरे व्हा,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.Video: पुनश्च हरी ओम... लॉकडाऊनचा कालावधी संपून पूर्वपदावर येण्यास सुरुवातविद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणामोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे