शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

Coronavirus: केंद्राने कोविडसाठी दिलेला २१३ कोटींचा निधी पडून; ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 3:34 AM

अखर्चित निधी परत मागवला : जूनपर्यंत करायचा होता खर्च, केवळ १८० कोटी वापरले

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला केंद्र सरकारने कोरोनासाठी दिलेल्या निधीपैकी निम्मा निधीही खर्च करता आलेला नाही. ३९३ कोटी रुपयांपैकी केवळ १८० कोटी रुपये राज्याने खर्च केले असून, आता सर्व जिल्ह्यांकडून अखर्चित निधी परत मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जूनपर्यंत हा निधी खर्च करावयाचा होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला या आर्थिक वर्षासाठी सुमारे १,५५६ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातूनच कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने ३९३ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला मंजूर केला. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीसाठी हा निधी देण्यात आला होता. यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून निधीची मागणी करण्यात आली आणि त्यानुसार सर्व ३९३ कोटी रुपये जिल्ह्याना वितरित करण्यात आले. याच दरम्यान ८ ऑक्टोबर २०२० रोजी जेव्हा राज्याच्या खर्चाचा आढावा घेतला गेला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. ती म्हणजे या सर्व जिल्ह्यांनी केवळ १८० कोटी रुपयांचा निधी वापरला आहे. म्हणजेच उर्वरित २१३ कोटी पडून राहिले आहेत.

अशातच केंद्र सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील निधीही मंजूर झाला असताना आधी दिलेल्या निधीतील ७५ टक्केही निधीच्या खर्चाची अट महाराष्ट्राने पूर्ण केलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता आरोग्य प्रशासनाची धावपळ उडाली आहे. आता सर्वच जिल्ह्यांकडून अखर्चित निधी मागवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. अखर्चित निधी किती होता हे पाहून मग पुन्हा आवश्यक असणाऱ्या जिल्ह्यांना या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. १९ आक्टोबरपर्यंत हा निधी परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोल्हापूरला मात्र नोटीसएकीकडे अन्य जिल्ह्यांचा निधी पडून असताना कोल्हापूर जिल्ह्यांचा जादा खर्च झाला म्हणून शासनाने नोटीस काढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्यांना ५ कोटींची रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्यापासून ते लाखो नागरिकांच्या संस्थात्मक अलगीकरणासाठीची सोय करणाऱ्या प्रशासनाला मात्र जादा खर्च का केला म्हणून नोटीस काढल्याचा अजब प्रकार घडला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार