CoronaVirus: “काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 21:21 IST2021-05-14T21:19:24+5:302021-05-14T21:21:32+5:30
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

CoronaVirus: “काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक”
मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp atul bhatkhalkar replied prithviraj chavan over statement)
कोरोनाची परिस्थिती, लसी, बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांच्या कमतरतेवरून गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्याने पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेससह काही नेत्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातूनही केंद्रावर निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी देशातील सर्वांत मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट असल्याची टीका केली आहे. याला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.
हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?; मराठा आरक्षणावर अशोक चव्हाणांचा सवाल
पृथ्वीराज चव्हाणांना मोदी NPA वाटणे स्वाभाविकच
महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPA च्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री @prithvrj पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 14, 2021
UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी... असे अनेक 'परफॉर्मन्स' पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.
पृथ्वीराज चव्हाणांची पंतप्रधान मोदींवर नाव न घेता टीका
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्विट केला. त्यावर देशातील सर्वांत मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट असे लिहिलेले असून, हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली. एक फोटो ट्विट करत त्यात कोविड रुग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते.
पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष
दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ५३,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांत ३९,९२३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. सध्या राज्यात ५,१९,२५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८८.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी घट दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत १,६५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर २,५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली.