शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: “कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 14:08 IST

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमानंतर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाकोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?अशोक चव्हाण यांची ट्विटरच्या माध्यमातून विचारणा

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स या सर्वांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मात्र, यावरून आता काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार, असा थेट सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. (ashok chavan asked when pm narendra modi will do press conference over corona situation)

पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक आरोग्य तज्ज्ञ, लॅबमधील तंत्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावरून काँग्रेस नेते आणि आमदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 

यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद कधी घेणार?

कोरोनाबाबत लोकांनी वेळीच नेमकी काय उपाययोजना करावी, यावर 'मन की बात'मध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स चालक आणि रूग्णांशीही प्रश्नोत्तरे झाली. स्वागत आहे. पण, कोरोनाबाबत केंद्राने वेळीच नेमकी काय उपाययोजना केली, यावर पत्रकार परिषद कधी घेणार? देशाला उत्तरे कधी मिळणार?, अशी विचारणा अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून केली आहे. 

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

आतातरी 'जन की बात' करा

यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. आता तरी जन की बात करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय कामे बाजूला ठेवावीत आणि जनतेला मदत करावी. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. हाच काँग्रेसचा धर्म आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

दरम्यान, कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचे आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. कोरोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असे पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसMan ki Baatमन की बातprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण