“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 02:34 PM2021-04-24T14:34:09+5:302021-04-24T14:39:34+5:30

ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केले.

"Prime Minister Modi should change himself like Uddhav Thackeray" | “पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

googlenewsNext
ठळक मुद्देRSS आणि पंतप्रधान मोदी दोघेही पूर्णपणे जातीयवादीपंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसारखे बदल करावेतरामचंद्र गुहा यांचे पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय घेण्याची सवय असून, वाईट गोष्टींसाठी मात्र ते राज्य सरकार तसेच विरोधी पक्षांना जबाबदार ठरवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी व्यक्त केले. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी अनेक विषयांवर परखड भाष्य केले आहे.  (pm narendra modi should change himself like uddhav thackeray said ramchandra guha)

रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केले. पंतप्रधान मोदी हे जातीयवादी असून कोरोना कालावधीमध्ये त्यांनी कुंभमेळ्याला दिलेल्या परवानगीवरून हे दिसून येते, अशी टीका गुहा यांनी केली आहे. गुहा यांनी पंतप्रधान मोदींचा स्वभाव  ‘कल्ट पर्सनॅलिटी’ सारखा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:ला त्यांच्या होकारात होकार मिळवणाऱ्या आणि समर्थकांच्या गराड्यामध्ये ठेवले आहे. अनेक आयएएस अधिकाऱ्यांची हुशारी आणि कामातील अचूकता ही पंतप्रधानांपेक्षा अधिक असल्याने त्यांना दूर लोटण्यात आले. पंतप्रधान मोदींना फुशारक्या मारणे आणि श्रेष्ठ असल्याची भ्रामक कल्पना डोक्यात ठेऊन वावरायला आवडते, असेही गुहा यांनी म्हटले आहे. 

“तेव्हाच म्हणालो होतो, अनिल देशमुखांवर कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट”

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसारखे बदल करावेत

उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या फॅसिस्ट धाटणीच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळे केले. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि एक मधला मार्ग निवडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वत:मध्ये बदल घडवले. पंतप्रधान मोदी यांनीही तसेच काहीसे केले पाहिजे, असे गुहा यांनी सांगितले.

न्या. एन. व्ही. रमणा नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

RSS आणि पंतप्रधान मोदी दोघेही पूर्णपणे जातीयवादी

पंतप्रधान मोदी हे आजही मनापासून संघाशी जोडलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी दोघेही पूर्णपणे जातीयवादी आहेत, असा दावा करत पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार केला तसेच कोरोनाचा फैलाव होईल हे ठाऊक असतानाही मोदींनी कुंभमेळा आणि शाही स्नानाला दिली. गतवर्षी मोदी सरकारने तबलिगींना लक्ष्य केले, असेही गुहा यांनी म्हटले आहे. 
 

Read in English

Web Title: "Prime Minister Modi should change himself like Uddhav Thackeray"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.