शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

Coronavirus : चिंताजनक! महाराष्ट्रात 283 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 13:32 IST

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 16,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) राज्यात 283 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील तब्बल 187 नव्या रुग्णांचा समावेश आहे. तर ठाण्यातही कोरोनाचे आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. आज मुंबईत 187, ठाण्यात 21, वसई-विरार 22, पिंपरी-चिंचवडमध्ये 9, मीरा-भाईंदरमध्ये 7, भिवंडीत 1,कल्याण-डोंबिवलीमध्ये 16, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, सातारा 1,सोलापूर 1 आणि रायगडमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 283 वाढली आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील. राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 165,153 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 24 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 2,414,098 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 629,390 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : देशातील 'या' झोनमधील नागरिकांना दिलासा! आजपासून कोणकोणत्या सेवा सुरू जाणून घ्या

धक्कादायक! ...अन् पोलिसाने स्वत:च्याच मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Coronavirus : धोका वाढला! देशातील 'या' 10 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्याला पोलिसांनी दिली अनोखी शिक्षा, Video पाहून कराल कौतुक

Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणेDeathमृत्यू