शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

Coronavirus: राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:40 AM

दिवसभरात ७७१ रुग्ण, तर ३५ मृत्यूंची नोंद,

मुंबई : राज्यात सोमवारी ७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात सोमवारी ३५ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ५८३ झाला आहे. तर मुंबईत सोमवारी ५१० कोरोना बाधितांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ९ हजार ३१० इतकी झाली आहे. तर दिवसभरात १८ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा ३६१ झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोरोनाचे सावट अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ३५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईमधील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यातील १, औरंगाबाद शहरातील १, ठाणे शहरातील १ आणि नांदेड शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू सोमवारी मुंबईत झाला. दिवसभरात ३५० जणांना डिस्चार्ज मिळाला असून आजपर्यंत राज्यातून २,४६५ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सोमवारी नोंद झालेल्या ३५ मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. ३५ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत.लोक होम क्वारंटाइनसध्या राज्यात १,९८,०४२ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३,००६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,७६,३२३ नमुन्यांपैकी १,६२,३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १०२६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण १०,८२० सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे.राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहे. त्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक आहे. गावी जाण्याच्या परवानगीसाठी स्थलांतरित मजुरांनी सोमवारी मालाड येथे पोलीस स्टेशनच्या बाहेर लावलेली रांग.नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असली, तरी सर्वाधिक रुग्णही बरे झालेत. रविवारी १०७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १२८४२ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण २६.५२ टक्के आहे. पंधरा दिवसांपूर्वी ते १४ टक्के होते. सध्या देशात ४६, ४३७ रुग्ण असून त्यातील २९४५३ जणांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत जगात एकूण रुग्णांची संख्या ३६ लाखांवर गेली असून, मृतांचा आकडा २ लाख ५0 हजारांवर म्हणजेच अडीच लाखांच्यावरपोहोचला आहे. अमेरिकेतील मृतांची संख्याच ६८ हजारांवर आहे. आशियातील ४८ देशांत असलेल्या ५ लाख ६६ हजार ४६० पैकी २ लाख ९८ हजार २१७ रुग्ण बरे झाले आहेत. आशियात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. आशियात मृतांचा आकडा १९,७७८ असून त्यापैकी सुमारे १५ हजार रुग्ण इराण, चीन आणि तुर्कस्थानातील आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस