शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

corona virus : निवासी डॉक्टरांनाही वाढीव मानधन द्या, सत्यजित तांबेंची ठाकरे सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 7:38 PM

वाढीव विद्यावेतनाच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत  राज्यशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.

मुंबईः निवासी डॉक्टरांना सर्वात कमी विद्यावेतन देणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य असल्याने बऱ्याच काळापासून वाढीव विद्यावेतनासाठी विविध आंदोलने बऱ्याच काळापासून डॉक्टर संघटना करत आहेत. परंतु अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉक्टरांच्या वाढीव विद्यावेतनाच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत  राज्यशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्राने इतर राज्यातील एमबीबीएस डॉक्टर  पाचारण केले असून, त्यांना 50 हजार ते 2 लाख  रुपये असे भरघोस वेतन  तर सक्तीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना 15 हजार रुपयांचे वाढीव मानधन मिळत असताना निवासी डॉक्टरांसाठी अशी काही तरतूद नसल्याकडे तांबे यांनी लक्ष वेधले आहे.  MD च्या कोर्सेस अंतर्गत निवासी डॉक्टरांना  सर्वात कमी विद्यावेतन देणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य आहे.दुसरे म्हणजे कोरोनाच्या काळात इतर डॉक्टरांप्रमाणे अतिरिक्त मानधन मिळत नसल्याने या निवासी डॉक्टरांमध्ये प्रशासनाकडून अन्यायाची आणि  गृहीत धरल्याची भावना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी सत्यजीत तांबे यांनी  केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या