शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Lockdown अखेर आदेश आला! राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:11 IST

कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

मुंबई : राज्यात दर दिवशी जवळपास ७००-८०० च्या घरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता उद्या संपणारा केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढविण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. राज्यात मुंबई-पुणे सर्वाधिक बाधित असले तरीही उपराजधानी नागपूरमध्येही रुग्णांचा आकडा ४९ वर गेलेला आहे. यामुळे राज्यात उद्यापासून पुढील दोन आठवडे म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

याची अधिसूचना आज आज काढण्यात आली असून २५ मार्चला केंद्र सरकारने काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये  २५ मार्चला सुरु झालेले लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे म्हटले आहे. हे लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर रात्री १२ वाजल्यापासून सुरू राहणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनमधील जिल्ह्यांमधील खबरदारीची उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी व्हिडीओ संवाद साधला. याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश दिले होते. येत्या एक - दोन दिवसांत केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. 

ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. त्यानुसार या झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले. मात्र, ‘रेड झोन’मधील जिल्ह्यांत ‘लॉकडाउन’ अधिक कडक करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्राने काही प्रमाणात ‘लॉकडाउन’ शिथिल केले तरी मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ‘लॉकडाउन’ शिथिल होणे कठीण असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले आहेत. मात्र, अद्याप यावर स्पष्टीकरण आलेले नाही. यामुळे लॉकडाऊनची सावट या सर्व झोनवर राहण्याची शक्यता आहे. 

मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा

आय अ‍ॅम सॉरी! गंगा किनारी १० परदेशी फिरताना सापडले; शिक्षा पाहून 'हसाल'

बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह

भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपे