शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

देवाघरी गेला अकाली आपला पांडुरंग..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 11:23 AM

कोरोनाशी झुंज देताना हुतात्मा झालेल्या कोविडयोद्धा पत्रकार पांडुरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

बूम बोले लेखणीला, झाला रंगाचा बेरंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥धृ॥कोरोनाने गिळले रंक आणि रावयात नाही कोणताच केला भेदभावजागे होऊ आता सारे देऊ साथसंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥१॥पत्रकारितेत पोटापायी काया झिजवलीसंसर्ग सोसुनिया बातमी पोहोचवलीडळमळू लागे चौथा लोकशाहीचा स्तंभदेवाघरी अकाली गेला आपला पांडुुरंग ॥२॥तत्पर वार्तांकनी देह बुडूनिया जाईघर-दार, बायको-मुले पोरकीच होईमदतनिधी मिळणारा मात्र गेला नि:संगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥३॥कोण-कशाबद्दल-कुठे-केव्हा-का नि कसे?बातमीत उत्तर शोधताना पत्रकारच फसेस्पॉटवरून लाईव्ह, पण लाईफ होई भंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥४॥अनेकांवर अन्यायाला फोडली वाचाप्रश्नांनी माझ्या बंद प्रस्थापितांची भाषाघेई विषाणू दंश, पण मी बाईटमध्ये दंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥५॥

लॉकडाऊनमध्ये जग असताना ठप्पपत्रकार माझ्यातला राहील कसा गप्पसामान्यांच्या व्यथांचे उलगडे अंतरंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥६॥जनतेच्या कथा-व्यथांना फोडले तोंडउलगडले घोटाळे, सत्तांधांचे कांडकधी उघड केले या समाजाचे व्यंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥७॥बातमी करताना झाला तोच बातमीकिंमत मोजली करून काम जोखमीगेली निघुनिया वेळ, नका घालू वादंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥८॥देऊन स्पॉट न्यूज, फीड, फोनो, स्क्रोलव्हॉईसओव्हर शांत, संपला त्याचा रोलफ्रंटपेज स्टोरी त्याची, झाली ब्रेकिंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥९॥वेळ अशी आता कुणावरी न येवोरोगातून या प्रत्येक बरा होऊन जावोहोऊ कोरोनामुक्त, विश्वास हा अभंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग ॥१०॥बूम बोले लेखणीला, झाला रंगाचा बेरंगदेवाघरी अकाली गेला आपला पांडुरंग॥

                                                          - अभय नरहर जोशी -

 

 

 

टॅग्स :PuneपुणेJournalistपत्रकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूState Governmentराज्य सरकार