Join us  

Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:47 PM

Shakti Pumps India share price : सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किमतींनी अपर सर्किटला धडक दिली. शेअर्सनं यानंतर आपला ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला.

Shakti Pumps India share price: शेअर बाजारात मालामाल करत असलेल्या शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडच्या शेअर्सना गुरुवारी पाच टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किमतींनी अपर सर्किटला धडक दिली. कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्यानं वाढ होण्यामागे चौथ्या तिमाहीचे दमदार निकाल असल्याचं मानलं जात आहे. गेल्या ३ सत्रात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत १५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 

५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर शेअर 

गुरुवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून २०७०.३५ रुपयांवर पोहोचला. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९४.७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात शक्ती पंपच्या शेअरच्या किमतीत ३८२ टक्क्यांनी वाढ झाली. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक वाढलेत. 

आज ५ टक्क्यांच्या वाढीनंतर शक्ती पंप्सच्या शेअरची किंमत ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच २०७३.३५ रुपयांवर पोहोचली. कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४०६.२० रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४१५३.९८ कोटी रुपये आहे. 

मजबूत तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदार उत्साही 

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ८९.७० कोटी रुपये होता. तर वर्षभरापूर्वी तो २.२ कोटी रुपये होता. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत कंपनीला ४५.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीत शक्ती पंप्सला ६०९.३० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक