शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 12:46 PM

Guru Asta 2024: गुरु अस्ताचा काळ महिनाभराचा आहे, या काळात वैयक्तिक, नैसर्गिक, राजकीय शुभ-अशुभ घटना घडू शकतात असे ज्योतिष तज्ञांचे मत आहे!

धन, धर्म, ज्ञान, सुख, समृद्धी, विवाह, संतती, भाग्य, संतुलन आधीचे कारक देवगुरू बृहस्पती वृषभ राशी मध्ये ८ मे २०२४ ते १ जून २०२४ पर्यंत गुरु अस्त राहतील. या घटनेचा प्रभाव प्रत्येक राशीवर होईल. पण धनु आणि मीन जास्त प्रभावित राहतील, कारण या काळात या  राशि ना स्वामी बल कमी होईल.  याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत, गजानन परब गुरुजी!

गुरु अस्त म्हणजे काय ते जाणून घेऊ!

आपण जर कुंडलीत पहाल तर जो ग्रह अस्त झालेला असतो त्या समोर एक जळत असलेले चिन्ह असते, म्हणजे जळत असल्याचे निदर्शनात येते किंवा त्या समोर कंसात(अ) असे असते, म्हणजे तो ग्रह त्या वेळी अस्त आहे.  ग्रह जेव्हा आकाशात गोचर भ्रमण करतात त्यावेळी ग्रह एक ठराविक अंतरात सूर्याच्या जवळ येतो तो ग्रह अस्त होत असतो, मग प्रत्येक ग्रह एक वेगवेगळ्या अंतरात अस्त होतो. सूर्य सिद्धांत मध्ये याचा उल्लेख केलेला आहे की कोणता ग्रह किती अंतरात सूर्याजवळ अस्त होत जातो, त्या नुसार गुरु सूर्याच्या ११ अंश अंतरात येतो त्या वेळी अस्त होतो. अस्त होत असलेला ग्रह शुभ फळ देण्यात असमर्थ होतो. बृहतसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे शनि ग्रह ज्यावेळी अस्त होतो त्या वेळी राजाला, आधुनिक जगात प्रशासकीय काम करणार्‍यांना, नेते, मंत्री, प्रमुख यांना  त्रासदायक, भीतीदायक स्थिति निर्माण होत असते. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

ग्रह अस्त झाल्याने काय होते? अस्त होणे अशुभ का संगितले आहे? 

सर्वच ग्रहांना ऊर्जा आणि प्रकाश सूर्यापासून प्राप्त होत असतो, परंतु त्या साठी ग्रहांना सूर्यापासुन काही अंतरात राहणेही आवश्यक असते, ग्रह ज्यावेळी सूर्याच्या खूप जवळ येतात त्यावेळी ते बलहीन होतात, जळल्याप्रमाणे होतात, जसे आपण अग्नीच्या जवळ जातो त्यावेळी आपली  त्वच्या उष्णतेने जळल्या प्रमाणे भासते, त्याच प्रमाणे ग्रह बलहीन होतात त्यांच्या कारक तत्वात कमतरता येते यालाच अस्त म्हटले आहे. 

फलदीपिका सांगते, अस्त ग्रह नीच अवस्थे प्रमाणे फळ देतात. ज्या ग्रहाचा स्वप्रकाश नष्ट होतो, तो अपेक्षित फळ कस देईल? पाराशार संहिता सांगते, कोणताही ग्रह ज्यावेळी सूर्या पासून १८० अंशात असतो, म्हणजे सूर्यापासून सातव्या स्थानात असतो त्यावेळी तो पूर्ण प्रकाशित होऊन बलवान असतो, चंद्र सूर्यापासून १८० अंशात सातव्या राशीत समोर असतो त्यावेळी पोर्णिमा तिथी असते तो पूर्ण प्रकाशित होऊन बलवान होतो. 

कुंडली नुसार गुरु आपल्या महत्वपूर्ण भावांचे काराक आहेत, कालपुरुष कुंडलीत ९ व्या व १२ व्या राशींचे स्वामी आहेत म्हणजे धर्म आणि भाग्य भावाचे स्वामी त्याच बरोबर मोक्ष भावाचा स्वामी आहे, गुरुच्या ५, ७, ९ अमृत्तुल्य अशा ३ दृष्टी आहेत, महर्षि पाराशर सांगतात कुंडलीतील शुभ आणि बलवान गुरु १ लाख दोष नष्ट करतात एवढे शुभ बृहस्पती आहेत.         मंगल कार्य वर्ज्य :

म्हणून सर्व गुण संपन्न, धन, धर्म, ज्ञान, सुख, समृद्धी, विवाह, संतती, भाग्य देणारा गुरु सर्व ग्रहात अत्यंत शुभ फलदायी, सर्व मंगल कार्याचा कारक असा ग्रह गुरु स्वत: अस्त होतो, त्या वेळी तो बलहीन असतो, त्याच्या कारक तत्वात कमतरता येते, त्यावेळी आपण कोणतेही शुभकार्य करणे योग्य नाही, मग विवाह, गृहप्रवेश, जमीन खरेदी, वगेरे सर्व मंगल कार्य करू शकत नाहीत. म्हणुन मुहूर्त शास्त्रानुसार गुरु  अस्त असताना, गुरु बल नसताना मुहूर्त वर्ज केले आहेत. गुरु धर्माचे ग्रह आहेत तर राहू त्यांच्या विरुद्ध ग्रह आहेत. गुरु अस्त होतात तेव्हा राहुचा अशुभ प्रभाव पण वाढतो. म्हणूनच नवीन कामे, नवीन इनवेष्टमेंट या काळात वर्ज्य  केलेली चांगली.   

गुरु अस्ताचा अशुभ प्रभाव कोणत्या राशींवर?

धनु, मीन राशींचे स्वामी गुरुआहेत. कर्क चे उच्च आहेत. अस्त काळात धनु, मीन, कर्क, सिंह या राशीना अशुभ फळ प्राप्त होण्याचे जास्त पाहण्यात येते, त्याच प्रमाणे या काळात इतर राशीना ही शुभ-अशुभ फळ प्राप्त होते. 

गुरु अस्त काळातील उपाय : 

गुरु अस्त काळात गुरु संबंधित उपाय अवश्य करावे. पिवळ्या वस्त्राचे दान करावे, मंदिरात साफसफाई व दान करावे. आपल्या गुरू जनांची सेवा करावी, शिव अभिषेक, विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्र चा पाठ करावा, गुरुवारी पिंपळाच्या खोडात जल किंवा दुध अर्पण करावे. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष