शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

corona virus ; औषध निर्मितीत भारत होणार स्वयंपूर्ण, ५३ रसायनांची निर्मिती करण्यात एनसीएलचा पुढाकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:44 PM

भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे.परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे.परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जीवनावश्यक औषधांच्या निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची आयात खंडित झाली आहे. भारत औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. परिणामी पुढील काळात औषधांचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या कच्च्या मालाचे परावलंबित्व संपवण्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रायोगशाळेने (एनसीएल) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी स्वदेशी पद्धतीने ५३ प्रकारच्या रसायनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

देशात औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असली तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल भारताला आयात करावा लागातो होता. स्वस्त असल्याने  हा कच्चा माल इतर देशातून केला जात होता. परंतु,सध्या देशांतर्गत  आयात-निर्यात बंद आहे. त्यामुळे कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २१ मार्चला झालेल्या कॅबिनेट बैठकीत औषधांबाबत चर्चा करण्यात आली. औषध निर्मितीसाठी आवश्यक अभिक्रिया कारक, उत्प्रेरक, रसायने, प्रक्रिया,तंत्र यांसह उद्योगांशी आणि उत्पादकांशी समन्वय करण्याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच देशातील नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आणि मोठा खप असलेल्या औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच रसायनांची निश्चिती राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली.  

'एनसीएल'ने या तीन ते चार रासायनांवर काम सुरु केले असून सेंद्रीय रसायनशास्त्रज्ञ (ऑरगॅनिक) आणि रसायन अभियंते यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले जात आहे. पूढील काही आठवड्यात ही रसायने निर्मित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया विकसित केली जाणार आहे. एनसीएलमध्ये पुढील काही आठवड्यांमध्येच रसायन निर्मितीची प्रक्रिया विकसित केली जाईल आणि पुढील कार्यवाही साठी सरकार आणि उत्पादकांना त्याचे अहवाल सादर केले जातील.त्यामुळे पुढील काही महिन्यांतच विविध औषधांचे उत्पादन आपल्या देशातील औद्योगिक कंपन्या करशकतील.

: डॉ.अश्विनी कुमार नांगीया, संचालक, एनसीएल.

  • राष्ट्राच्या संरक्षणासाठी औषधांच्या बाबतीतील स्वयंमपूर्णता सर्वात महत्वपूर्ण आहे. 
  • एनसीएल आग्रही आहे. त्यासाठी आवश्यक कच्च्या मालाची निर्मिती करणे आणि त्याचे स्वामित्वहक्क मिळवण्यासाठी देशाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे.
  • औषध निर्मितीसाठी अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक उपलब्ध आहे.
  • देशात संसर्गजन्य आजार,  जीवणूजन्य आजार, कवकजन्य आजार, मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, वेदनाशामक आदीसाठी लागणा-या औषधांच्या कच्च्या मालाची निर्मिती होणार आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधंHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या