Corona virus : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाचा फटका; लॉकडाऊनमध्ये वाहनविक्री 'रेड झोन' मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:02 PM2020-06-19T12:02:57+5:302020-06-19T12:06:09+5:30

राज्यात ल अडीच महिन्यात जवळपास 52 हजार तर पुण्यात फक्त चार हजार वाहनांची नोंदणी

Corona virus : Corona car sales in the "red zone", | Corona virus : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाचा फटका; लॉकडाऊनमध्ये वाहनविक्री 'रेड झोन' मध्ये

Corona virus : आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला कोरोनाचा फटका; लॉकडाऊनमध्ये वाहनविक्री 'रेड झोन' मध्ये

Next
ठळक मुद्देदेशात 2016 ते 2018 या कालावधीत वाहनविक्रीत सातत्याने वाढ

राजानंद मोरे
पुणे : मागील वर्षी विक्री कमी झाल्याने संकटात सापडलेल्या वाहन उद्योगाला यंदाही कोरोनाचा फटका बसत आहे. लॉकडाऊनमध्ये एप्रिलपासून अत्यल्प वाहनविक्री झालेली आहे. राज्यात अडीच महिन्यांत जवळपास ५२ हजार तर पुण्यात केवळ चार हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. एकट्या मार्चमध्ये ही नोंदणी अनुक्रमे २ लाख ६८ व २० हजार एवढी झाली होती. अनलॉकच्या काळात जूनमध्ये काहीशी स्थिती सुधारताना दिसत असली तरी वाहनविक्रीतील वाढ नगण्य आहे.
देशात २०१६ ते २०१८ या वर्षात वाहन विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण २०१९ मध्ये जागतिक आर्थिक मंदीचा फटका या उद्योगाला बसल्याने या तीन वर्षांतील नीचांकी वाहन विक्री झाली. ही स्थिती २०२० मध्ये काहीशी सुधारू लागलेली असतानाच कोरोनाचे संकट उभे ठाकले. देशभरातील लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने वाहनविक्री जवळपास ठप्प झाल्याचे चित्र आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असल्याने अधिक फटका बसला आहे. तर राज्यात सर्वाधिक वाहन नोंदणी व महसुल पुणे आरटीओमध्ये जमा होता. पण मागील तीन महिने वाहन विक्री रेड झोनमध्ये गेली आहे.
--------------------
मेच्या तुलनेत जूनमध्ये वाढ
मार्च महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात लॉकडाऊन झाल्यानंतर बीएस ४ निकषाच्या वाहन नोंदणीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. या महिन्यात पुण्यात सुमारे १ हजार वाहननोंदणी झाली. तर दि. १८ मेपासून नियमित वाहनविक्री सुरू झाली. पण सुरूवातीचे काही दिवस ग्राहकच घराबाहेर पडत नसल्याने केवळ ६५८ वाहनांची विक्री झाली. जूनमध्ये ही स्थिती काहीशी सुधारताना दिसत आहे. दि. १७ जूनपर्यंत पुण्यात २ हजार ३०० वाहने विकली गेली.
-----------------------
रस्त्यावर येणार कमी वाहने
पुण्यात दरवर्षी सुमारे अडीच लाख वाहने रस्त्यावर येतात. पण कोरोना संकटामुळे यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरणार आहे. मागील अडीच महिन्यांत केवळ चार हजार वाहनांची नोंदणी झाल्याने यंदा किमान लाखभर नवीन वाहनांची भर पडणार नाही. त्यामुळे दरवर्षी रस्त्यावर वाढणारी वाहने यंदा किमान एक लाखाने कमी होणार आहेत.
----------------------
यंदाची वाहनविक्रीची स्थिती (स्त्रोत - परिवहन पोर्टल)
महिना महाराष्ट्र
जानेवारी - २,१४,५६४
फेब्रुवारी-  १,७३,०८९
मार्च - २,६८,२००
एप्रिल-  २१,५३५
मे - ५,७४३
जून (दि. १७ पर्यंत) - २५,३५०
------------------------------------------
मागील तीन वर्षाची पुण्याची स्थिती (स्त्रोत - परिवहन पोर्टल) -
वर्ष/महिना।  मार्च       एप्रिल       मे            जून
२०१८      २६,४५१  २२,३७४   २३,१४१     २०,८५९
२०१९      १९,४९४  २२,८२५   २३,१४१।   १६,०२२
२०२०      २०,८०५   १,०३४      ६५८         २,२९२
----------------------------------------
पुण्यातील (एमएच १२) वाहन विक्री (स्त्रोत - परिवहन पोर्टल)
वर्ष विक्री
२०१६ २,५५,७२४
२०१७ २,६६,१७९
२०१८ २,७८,९२८
२०१९ २,४४,९८४
२०२० (१७ जूनपर्यंत) ६५,२९९
-----------------------------

Web Title: Corona virus : Corona car sales in the "red zone",

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.