शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Corona virus : बाबासाहेबांची जयंती यंदा ऑनलाईन..! प्रबोधनासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 18:00 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात दरवर्षी धुमधडाक्यात साजरी होते..

ठळक मुद्देसोशल मीडियावर विविध उपक्रम : कोरोनामुळे घरोघरी साजरी होणार जयंतीसोशल मीडियावर आंबेडकरी शाहिरी जलसे होतील, फेसबुकवर लाइव्ह चर्चा

धनाजी कांबळे - पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात दरवर्षी धुमधडाक्यात साजरी होते. यंदा कोरोनामुळे देशात लॉकडाउन असल्याने जयंतीच्या कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत. मात्र, जयंतीची तयारी अनेक मंडळं, संस्था सहा महिन्यांपासून सुरु करतात. प्रबोधनासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन होते. यावर्षी घरोघरी आणि सोशल मीडियात धुमधडाक्यात जयंती साजरी होणार आहे.राजाराणीच्या जोडीला...पाच मजली माडीला...आहे कुणाचं योगदानं...लाल दिव्याच्या गाडीला...या गाण्याची सध्या सोशल मीडियात जोरदार धूम सुरु असून, अनेकांनी व्यक्तीगत पातळीवर जयंती उत्सव सुरु देखील केला आहे. यंदा मिरवणुका, भव्य कार्यक्रम होणार नसले, तरी घराची सजावट, विद्युत रोषणाई केली जाणार आहे. दर वर्षी १४ एप्रिलला बाबासाहेबांना वंदन म्हणून १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. कोरोनामुळे हा उपक्रम वैयक्तिक पातळीवर करण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर आंबेडकरी शाहिरी जलसे होतील, फेसबुकवर लाइव्ह चर्चा होतील. मंडळांनी जमवलेला निधी विभागातील गरजू कष्टकरी, कामगार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. तसेच राज्य शासनाच्या सहायता निधीमध्ये देखील मदत देण्यात येणार आहे. कोरोना संशयितांच्या आयसोलेशनसाठी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विहार वापरण्यास देता येईल, असे संदेश फिरत आहेत. उत्सव बहुजन नायकांचा, जोतिबा-भीमरायांचा! असे ऑनलाइन जयंती विशेषचे कार्यक्रमही सुरु झालेले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जागतिक ज्ञान दिवस म्हणूनही साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय प्रतिभेचा, ज्ञानाचा आणि बौद्धिक कौशल्याचा यशस्वी वापर करून राज्य सरकार आणि प्रांत सरकार यांना राष्ट्रीय धोरण स्वीकारण्यास भाग पाडले होते. आजच्या संकटाच्या काळात देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची गरज असताना बाबासाहेबांनी नियोजनासंदर्भात केलेले विवेचन अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचाही एक आराखडा जाणकार, तज्ज्ञांनी सरकारकडे द्यावा, अशी सूचना काही ज्येष्ठ विचारवंतांनी केली आहे. कोरोनाच्या संकटात बाबासाहेबांची वैज्ञानिक, विश्व करुणेची दृष्टी सर्व भेदभाव नष्ट करण्यास सध्याच्या परिस्थितीत जात-धर्म या पेक्षा मानव कल्याणास मार्गदर्शक ठरते, असेच उपक्रम राबवावेत, असेही आवाहन केले जात आहे.

.................................................................

घरोघरी साजरी करा जयंती.......डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गावोगावी शोभायात्रा काढली जाते. त्यात हजारो अनुयायी सहभागी होतात. यावर्षी कोरोनामुळे सर्वांनी घरीच जयंती साजरी करावी. तसेच घरोघरी जे करता येतील, ते उपक्रम करावेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocial Mediaसोशल मीडियाonlineऑनलाइन