Corona Virus: 10,000 patients in the maharashtra again! | Corona Virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा १० हजार रुग्ण!

Corona Virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा १० हजार रुग्ण!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शुक्रवारी दिवसभरात रुग्ण संख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला 
आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शुक्रवारी तब्बल १०,२१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १,२२५ रुग्ण हे नागपूरमध्ये नोंदण्यात आले आहेत. तर, मुंबईत १,१७४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच कोरोनाच्या वाढत्या संख्येने पुन्हा आरोग्य यंत्रणेसमोर समस्या उभी केली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचे प्रमाण जानेवारी महिन्यात दोन ते अडीच हजारांच्या घरात आले होते. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या वाढू लागली. शुक्रवारी रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी ऑक्टोबर २०२०मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांवरून हळूहळू खाली येऊ लागला होता.


वाढत्या रुग्णसंख्येत मुंबई महानगर प्रदेश २१३५, पुणे ८४९, पिंपरी ५४९, अमरावती ४३५, नाशिक ३५२, औरंगाबाद ३१८ आणि जळगाव येथील ३१५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात राज्यात ६,४६७ रुग्ण बरे झाले. आताच्या घडीला राज्यात ८८,८३८ एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Virus: 10,000 patients in the maharashtra again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.