शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

कोरोना.. दक्षता घ्या.. भीती नको..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 7:00 AM

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे, उपाययोजना, सद्य:स्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती....

ठळक मुद्देसोशल माध्यमाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणू आजाराबाबत सोशल माध्यमाद्वारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गर्दीत जाणे टाळावे, तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी, परंतु भीती बाळगू नका, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले आहे. कोरोना विषाणू आजाराची लक्षणे, उपाययोजना, सद्य:स्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबतही त्यांनी माहिती दिली.  

* - कोरोना विषाणू आजाराची लक्षणे : साध्या सर्दी-खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू कारणीभूत असतात. आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसनसंस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार हवेवाटे शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. 

* - खबरदारी : रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जात असून, आरोग्याच्या हितासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी.श्वसनसंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी.हात वारंवार धुवावे.शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरावा.अर्धवट शिजलेले, कच्चे मास खाऊ नये.फळे, भाज्या धुवूनच खाव्यात.श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्तींनी हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास; तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा........................

* - उपाययोजना-  कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत................................

* विमानतळांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील २१ विमानतळांवर कोरोनाबाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा करण्यात आली आहे........................................

* बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा - जे प्रवासी कोरोनाबाधित देशातून भारतात येत आहेत, त्यांची माहिती दररोज विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जात आहे. बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस या सर्व प्रवाशांचा दैनंदिन पाठपुरावा केला जातो. त्यांच्यामध्ये कोरोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे, याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:हून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात येत आहे. दैनंदिन पाठपुराव्यात एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.....................................

* प्रयोगशाळा निदान व्यवस्था - नवीन कोरोना विषाणू आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे येथे करण्यात आली आहे. संशयित रुग्ण कोणास म्हणावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सुस्पष्ट सूचना दिलेल्या असून, त्याचे पालन करण्यात येत आहे. एनआयव्ही पुण्याव्यतिरिक्त राज्यातील दोन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये (व्ही.आर.डी.एल.) देखील कोरोना निदानाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे या प्रयोगशाळा आहेत.

..................................

* - विलगीकरण आणि उपचार व्यवस्था - संशयित कोरोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांसाठी विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. याबरोबरच मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयांमध्ये देखील हा कक्ष सुरू केला आहे.

.....................* औषधसाठा - प्रामुख्याने पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट), एन ९५ मास्क, ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क, इत्यादींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.............................

*आरोग्य शिक्षण -  राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षणविषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे............................

* - नागरिकांना आवाहन - कोरोनासंदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मीडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय याविषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत, तसेच आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून सर्वांनी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. गर्दीत जाणे टाळावे. वारंवार हात धुवावा. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकताना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा व सामाजिक शिष्टाचार पाळावेत..................................

* - कोरोना नियंत्रण कक्ष - सर्वसामान्य नागरिकांच्या कोरोनाविषयक शंका- समाधानासाठी टोल फ्री क्रमांक-१०४ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन (०२० -२६१२७३९४)  करण्यात आला असून तो सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत कार्यरत आहे.                                  * शब्दांकन - वृषाली पाटील, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर