controversial statements by Union Minister of BJP Raosaheb Danve | VIDEO: दानवे म्हणतात,'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही'
VIDEO: दानवे म्हणतात,'जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत गोवंश हत्या बंद होणार नाही'

मुंबई : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात दानवे म्हणतायत की, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाही. निवडणुकीच्या निकालापूर्वीचं हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे दानवे अनकेदा अडचणीत सापडले आहे. मग शेतकऱ्यांना साले म्हणाले असताना असो की, पैठणच्या सभेत लक्ष्मी दर्शनाचे विधान असो. त्यांच्या या विधानांमुळे भाजप पक्षाची मोठी बदनामी होताना पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे विरोधकांनी सुद्धा त्यांच्या अशा विधानांमुळे सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचे अनेकदा दिसून आले.

केंद्र सरकारकडून गोहत्या बंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर,तेव्हा बकरी ईद आली. काही लोकं माझ्याकडे आले. तसेच सरकारने गोहत्या बंदीचा घेतलेल्या निर्ण्यानंतर आम्ही काय करावे असे त्यांनी विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले होते. जोपर्यंत रावसाहेब दानवे आहे, तोपर्यंत गोहत्या बंद होणार नाही. असे वक्तव्य यावेळी दानवे यांनी केले असल्याचे या व्हिडिओमधून दावा केला जात आहे.

त्याचप्रमाणे दोन रुपये किलो गहू, तीन रुपये तांदूळ मी देतो. कारण, केंद्रात माझ्याकडे अन्नपुरवठा मंत्रालय आहे. या जिल्ह्यात सर्वांत जास्त अवैध धंदे चालतात. चंदन चोरी, तांदुळाचा गैरव्यवहार होतो. मी सगळे एका दिवसात बंद करेन. असेही दानवे म्हणाले.

 

 


Web Title: controversial statements by Union Minister of BJP Raosaheb Danve
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.