शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कमिशनसाठी ठेकेदाराची अडवणूक

By admin | Updated: March 30, 2015 04:17 IST

नक्षलवादी भागात पोलिसांना आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक सामग्रीची रीतसर प्रक्रियेतून खरेदी केल्यानंतरही एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कमिशन न

जमीर काझी,  मुंबईनक्षलवादी भागात पोलिसांना आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक सामग्रीची रीतसर प्रक्रियेतून खरेदी केल्यानंतरही एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला कमिशन न मिळाल्याने एका ठेकेदाराचे कोट्यवधींचे बिल नऊ महिन्यांपासून प्रलंबित ठेवल्याचे प्रकरण गृहविभाग व पोलीस महासंचालक कार्यालयात सध्या चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे गृहखात्याची धुरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत योग्य कारवाईसाठी तब्बल सहावेळा सूचना करूनही अधिकाऱ्याकडून या सूचनेला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.नियमानुसार एखाद्या सामग्रीचा पुरवठा झाल्यानंतर शासनाकडून त्याची ९० टक्के रक्कम तातडीने अदा करण्याचा नियम आहे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात नक्षलविरोधी अभियानाला लंडन बनावटीचे जीपीएस ट्रॅकर पुरविण्यात आले. मात्र अद्याप त्याचे बिल मंजूर करण्यात आलेले नाही. अपर महासंचालक (नियोजन व समन्वय) हेमंत नागराळे यांनी १ कोटी ६१ लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी १० टक्के रक्कम देण्याची मागणी मध्यस्थामार्फत केल्याचा आरोप ठाणे येथे राहत असलेल्या मराठी ठेकेदाराने केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याने रीतसर तक्रारदेखील केलेली आहे.मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही कार्यवाही होत नसल्याने ठाण्यातील हा मराठी ठेकेदार वैतागला आहे. कर्जाची परतफेड होत नसल्याने बॅँकेला तारण ठेवलेला फ्लॅट जप्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी हे प्रकरण मार्गी न लागल्यास हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचे या ठेकेदाराने ठरविले आहे.