Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 00:20 IST2025-10-19T00:19:07+5:302025-10-19T00:20:45+5:30
Kasara Ghat Protest: राज्यातील आदिवासीवाश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबई च्या वेशीवर येऊन ठेपला आहे.

Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
राज्यातील आदिवासीवाश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराचा बिर्हाड मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. आपल्या विविध मागण्यासाठी कामगाराचा बिर्हाड मोर्चा १४ ऑक्टोम्बर २५ रोजी नाशिक येथून मुंबई कडे निघाला. आज १८ ओक्टोम्बर रोजी हा मोर्चा मुंबई च्या वेशीवर म्हणजेच कसारा घाटावर येऊन ठेपला आज बिर्हाड मोर्चा तील मोर्चे कराणी कसारा घाटाजवळ ठिय्या आंदोलन करीत राज्य शासनाचा निषेध केला.
मागील वर्षी आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील रोजंदारी वर काम करणाऱ्या काम करणाऱ्या कायम केले नाही. यासह अनेक प्रलंबीत मागण्या देखील पूर्ण केल्या नाही. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी सुमारे ३०० जणांचा हा मोर्चा मुंबईकडे येणार आहे. दरम्यान, या मोर्चासाठी कसारा घाटात ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉक्टर.डी. एस. स्वामीं, उपविभागीय पोलीस अधीक्षक् मिलिंद शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप गिते कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित ,इंगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका आहिररावं यांनी चोखं बंदोबस्त ठेवला.
प्रमुख मागण्या
बाह्यस्रोत भरती रद्द करा:
आंदोलकां नी बाह्यस्त्रोत एजन्सीद्वारे केल्या जाणाऱ्या भरत्या रद्द करा, ही मागणी आग्रही धरली असून कामावरून कमी केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून नोकरीवर परत घेण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे ललित चौधरी यानि सांगितले.
पाच तासापासून रस्त्यावर ठिय्या :
दरम्यान, बिर्हाड मोर्चाच्या मोर्चे कारणी आज दुपार पासून इंगतपुरी जवळ नाशिक मुंबई लेनवर ठिय्या आंदोलन सुरु करीत एक लेन बंद करून टाकली. पर्याय म्हणून महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवली. दरम्यान मोर्चे कराणी आपला मोर्चा रस्त्यावरच ठाण मांडून ठेवत मुक्काम ठोकला असून सकाळ पर्यत निर्णय न लागल्यास तीव्र आंदोलन करीत मोर्चा मुंबई कडे जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बिर्हाड मोर्चात महिलांचा सहभाग जास्त असल्याने पोलिसांसामोर मोठे आवाहन उभे राहिले.