शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ एजंट बंदीवरून सरकारला ‘कन्टेम्प्ट’ नोटीस

By admin | Updated: February 28, 2015 05:08 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंट प्रतिबंधाच्या नावाखाली वाहन मालकांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत

नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) एजंट प्रतिबंधाच्या नावाखाली वाहन मालकांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या आरोपाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाविरुद्ध न्यायालयीन अवमानाची (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) नोटीस काढली आहे.संतोष गुप्ता व इतर ८ वाहन मालकांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाल्यानंतर न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. अशोक भंगाळे यांच्या खंडपीठाने ही नोटीस काढली. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, परिवहन आयुक्त महेश झगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) शरद जिचकार व उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार यांना ही नोटीस काढण्यात आली असून त्यांनी त्यास १६ मार्चपर्यंत उत्तर द्यायचे आहे.परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी १२ जानेवारी २०१५ रोजी परिपत्रक काढून परिवहन कार्यालयांत एजंटना प्रवेश करू देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. यामुळे परिवहन अधिकारी एजंटसह वाहन मालकांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारत आहेत. उच्च न्यायालयाने १९८७ व १९९९ मध्ये दाखल प्रकरणांवर निर्णय देताना निर्धारित नमुन्यातील पत्र देऊन अधिकृत करण्यात आलेल्या प्रतिनिधींना प्रतिबंध करू नये, असे निर्देश दिले आहेत. झगडे यांचे परिपत्रक या निर्णयांचा अवमान करणारे असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, शासनातर्फे सहायक सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)