मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फे्रंडली’

By Admin | Updated: February 1, 2015 01:00 IST2015-02-01T01:00:51+5:302015-02-01T01:00:51+5:30

जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणारे मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील, अशी ग्वाही नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित

Construction of Metro Rail 'Pipal Ferndali' | मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फे्रंडली’

मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फे्रंडली’

बृजेश दीक्षित यांची ग्वाही : कंपनी कायद्याखाली आठवड्यात नोंदणी
मोरेश्वर मानापुरे - नागपूर
जलद परिवहनासाठी नागपुरात लवकरच सुरू करण्यात येणारे मेट्रो रेल्वेचे बांधकाम ‘पीपल फ्रेंडली’ राहील, अशी ग्वाही नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली.
हा प्रकल्प कुणालाही त्रास न होता २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. मेट्रो माझ्यासाठी आहे, असे लोकांना वाटले पाहिजे. गाड्या पार्किंगमध्ये ठेवून मेट्रोने प्रवास करावा, असे उद्दिष्ट आहे. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, पर्यावरणमुक्त वातावरण आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी करणारा हा प्रकल्प आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याचा मेट्रोचा उद्देश आहे. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे दीक्षित म्हणाले.
जागेचे सर्वेक्षण
एकूण ३६ कि़मी.चा दोन मार्गे आणि बांधकामाच्या पूर्णत्वापर्यंत ८,९०० कोटींची गुंतवणूक असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी सध्या जागेचे सर्वेक्षण सुरू आहे. दोन्ही मार्गासाठी २०-२० अधिकारी कार्यरत आहेत. पुढील कामाच्या रूपरेषेसाठी बोर्डाची पहिली बैठक पुढील महिन्यात होणार आहे. चमूची नियुक्ती, त्यांचे अधिकार रोडमॅप, कामाची पद्धत, प्रत्यक्ष काम आणि सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. चेअरमन आणि एमडीसह बोर्डाचे दहाही सदस्य उपस्थित राहतील. कंपनी कायद्यासाठी नोंदणीसाठी कंपनीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. दहा दिवसात कंपनी म्हणून नोंदणी होईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षपदी शंकर अग्रवाल
नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.च्या दहा जणांच्या चमूमध्ये अध्यक्षपदी शंकर अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या केंद्र सरकारच्या शहरी विकास खात्यात सचिव पदावर कार्यरत आहेत. अग्रवाल यांच्यासह पदसिद्ध सदस्यांमध्ये याच खात्यातील मुकुंद कुमार सिन्हा व झांजा त्रिपाठी, कोची मेट्रोचे वेदमणी तिवारी, भारतीय रेल्वेचे शैलेंद्र सिंग, व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, अतिरिक्त वित्त सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, यूडीआयचे प्रधान सचिव नितीन करीर, नागपूरचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आणि नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांचा समावेश आहे.

Web Title: Construction of Metro Rail 'Pipal Ferndali'