शाखा तिथे संविधान; शिवसेना शिंदे गटाचे अभियान, कधी होणार शुभारंभ? विविध उपक्रम रावबणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:53 IST2025-11-24T17:51:30+5:302025-11-24T17:53:44+5:30
Shiv Sena Shinde Group News: भारतीय संविधान दिनापासून शाखा तिथे संविधान हे अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

शाखा तिथे संविधान; शिवसेना शिंदे गटाचे अभियान, कधी होणार शुभारंभ? विविध उपक्रम रावबणार
Shiv Sena Shinde Group News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून येत्या 26 नोव्हेंबर या "भारतीय संविधान दिना"पासून "शाखा तिथे संविधान" हे अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानामागे संविधानाची मूल्य लोकांच्या मध्ये पोहोचवणे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात्मकतेप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य हेतू आहे.
या अभियानाचा शुभारंभ २५ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ५ वाजता पक्षाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय - बाळासाहेब भवन, मुंबई येथून होणार आहे. त्यानंतर हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची संकल्पना आहे. ‘शाखा तिथे संविधान’ या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शिवसेनेच्या शाखा आणि कार्यालयात संविधानाची उद्देशिकेची प्रतिमा लावण्याचा संकल्प करून व सोबत भारतीय संविधानाची एक प्रत प्रत्येक शाखेत ठेवण्यात येणार असेही उद्देश्य आहे. ‘शाखा तिथे संविधान’ या अभियानाच्या अंतर्गत भारतीय संविधानाची मूल्य आणि महत्व लोकांच्या मध्ये विस्तारित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
- संविधान बाग - महाराष्ट्रात शिवसेना आणि सरकारच्या माध्यमातून संविधान बाग विकसित करण्यात येईल जिथे संविधान बनविण्याच्या प्रक्रियेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले परिश्रम हे अधोरेखित करण्यात येईल त्याच सोबत 288 सदस्य असलेल्या विधानसभेत ज्यात दहा महिलांचा समावेश होता यांसर्वांचा परिचय. संविधानची महत्वाची मूल्ये आणि सर्व सामान्य लोकांसाठी असलेल्या तरतुदीचे फलक लावण्यात येतील.
- रेल्वे आणि बस स्थानकात संविधान प्रेरणा स्थळ – दररोज बस आणि रेल्वेने लाखों लोक प्रवास करतात त्या रेल्वे स्टेशन वर राज्य परिवहन व रेल्वेच्या अनुमतीने संविधान प्रेरणा.
- बस थांबा आणि रेल्वे स्टेशन येथे संविधान जागृती – रेल्वे मंत्रालया कडून आणि राज्य परिवहन मंडळा कडून अनुमती घेऊन काही रेल्वे स्टेशन वर संविधानाची वैशिष्ट्य आणि सांविधानिक मूल्य लिहून सुशोभित केली जातील . या अभियान अंतर्गत पक्षाचे नेते आणि संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे देशातील सर्व रेल्वे स्टेशन मध्ये संविधानाची प्रस्ताविका लावून संविधान जागृती करण्याचा प्रस्ताव पाठवून मागणी केली जाईल.
- संविधान संग्रहालय – देशातील एका महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात जागतिक संविधान संग्रहालय निर्माण करण्यात येईल असा मानस आहे. ज्या ठिकाणी भारतीय संविधाना सोबत जगातील सर्वच राज्यघटना असतील ज्यामुळे अभ्यासक, विचारवंत लोकांना संविधानाचा अभ्यास करता येईल.
- सन्मान सोहळा - संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता,कार्यकर्ता, साहित्यिक, गायक, पत्रकार, कलावंत, शिल्पकार यांचा संविधान गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येईल. यासोबत वेळोवेळी पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून संविधान प्रचार आणि जागृतीच्या अनुषंगाने जे उपक्रम सुचविण्यात येतील ते देखील येणाऱ्या काळात याअभियानात समाविष्ट करण्यात येतील.