शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मोदी सरकारकडून महाराष्ट्राच्या आर्थिक कोंडीचे षड्यंत्र? काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 12:13 PM

Congress allegation on Modi government : 'स्वतःच्या हक्कांच्या पैशांची वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार टाळाटाळ करत असून राज्यातील बारा करोड जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे'

ठळक मुद्दे'2021 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 48,109 कोटी दिले जातील अशी तरतूद केंद्र सरकारने केली होती. पण प्रत्यक्षात केवळ 27,249 कोटी रुपये मिळाले.'

 मुंबई : 2020-21 आर्थिक वर्षात केंद्राकडून महाराष्ट्राला 80,164. 77 कोटी रुपये येणे बाकी आहे. या निधीत आदिवासी विभागाच्या योजनांसाठी मिळणाऱ्या निधीचा समावेश नाही. तिन्ही त्रिकाळ महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या विरोधात उणीदुणी काढणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मीठाला जागून केंद्र सरकारशी देखील एकदा भांडावे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा थोडा त्रास कमी होईल, अशी मागणी मुंबईकाँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे. (Congress allegation on Modi government)

महाविकास आघाडी सरकारची आर्थिक कोंडी करायची, जनसामान्यांची कामे- पगार मिळणार नाही, अशी तजवीज करायची व राज्य सरकार विरुद्ध जनतेमध्ये शोध निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करायचे षडयंत्र मोदी सरकारचे आहे व राज्यातून देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेते त्यांना साथ देत आहेत असा आरोप धनंजय जुन्नरकर यांनी केला .

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण जमा होणाऱ्या करातून केंद्र सरकार 58 टक्के घेते आणि विविध राज्यांना 42 टक्के रक्कम दिली जाते. त्याचे वाटप 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार होते. आजारी -गरीब राज्यांना जास्त वाटा दिला जातो .मात्र मोदी सरकार जिकडेतिकडे निवडणुका आहेत तिथे तिथे मोठ आकडे दर्शवणारी अनुदान घोषित करत आहे. महाराष्ट्राकडून सर्वात जास्त कर घेऊनही राज्याला फक्त 5.21 टक्के रक्कम दिली जात आहे. गेल्या वर्षापासून ही रक्कम देखील पूर्ण दिलेली नाही अशी माहिती त्यांनी दिली.

2021 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 48,109 कोटी दिले जातील अशी तरतूद केंद्र सरकारने केली होती. पण प्रत्यक्षात केवळ 27,249 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे 20, 860 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याची तूट झालेली आहे. राज्याचे तेवढे नुकसान झालेले आहे, असे धनंजय जुन्नरकर यांनी सांगितले. 

केंद्राकडून राज्याला कर आणि कराशिवाय महसूल मिळतो. त्याव्यतिरिक्त अनुदानही दिले जाते. केंद्रीय अर्थसंकल्पानुसार राज्याला 53, 770 कोटी रुपये सहाय्यक अनुदान मिळणे अपेक्षित होते ,त्यापैकी फक्त ते 30,610 कोटी रुपये मिळाले . मात्र 20160 कोटी अजून मिळाले नाहीत. करा शिवाय इतर महसुलाचे राज्याच्या हक्काचे 9,0 54 कोटी रुपये केंद्राने दिले नाही. जीएसटीचे .29,290 कोटी अजूनही थकीत आहेत. स्वतःच्या हक्कांच्या पैशांची वारंवार मागणी करूनही केंद्र सरकार टाळाटाळ करत असून राज्यातील बारा करोड जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मूग गिळून गप्प बसतात, अशी खरमरीत टीका धनंजय जुन्नरकर यांनी केली आहे.

केंद्राकडून येणे बाकी असलेल्या थकबाकीचा तपशिल- केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा 20,860 - वस्तू व सेवा कराची जीएसटी ची भरपाई 29,290- सहाय्यक अनुदानाची थकीत रक्कम 20,160- करेतर महसूलाचे राज्याचे पैसे 9,054- अंगणवाडी योजना 5,39.27- विशेष केंद्रीय सहाय्य 56- केंद्रीय अनुदान कलम 275 (1 ) - 50- पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप-148- पीव्हीटीजी अनुदान 7.50 एकूण येणे- 80,164.77(सर्व आकडे कोटीत) 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईPoliticsराजकारण