शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
2
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
3
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
4
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
5
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
6
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
7
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
8
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
9
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
10
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
11
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
12
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
13
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
14
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
15
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
16
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
17
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
18
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
19
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
20
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात

‪'पोरांच्या केला कामाचा वांदा; यांचा फक्त जाहिरातीचा धंदा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 12:38 PM

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून राज्यभर यात्रा काढल्या जात आहे. भाजपची महाजनादेश,शिवसेनेची जन आशीर्वाद व राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेनंतर आजपासून काँग्रेसच्या 'महापर्दाफाश' यात्रेला प्रारंभ होत आहे. त्याधीच काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षावर सोशल वार करण्यात येत आहे. ‪पोरांच्या केला कामाचा वांदा आणि यांचा फक्त जाहिरातीचा धंदा अशी टीका काँग्रेसच्या सोशल मिडिया हैंडलवरून करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे पहायला मिळत आहे. आजपासून सुरु होत असलेल्या 'महापर्दाफाश' यात्रेच्या आधी काँग्रेसने सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‪राज्यातील तरुणांना रोजगार मिळत नाही. बेरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र हे सरकार फक्त खोट्या जाहिरात देण्यातच मग्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला आता काँग्रेसने उत्तर देण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री यांनी महाजनादेश यात्रेत ज्या-ज्या ठिकाणी सभा घेऊन भाषण केले, त्या प्रत्येक ठिकाणी महापर्दाफाश सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.