“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:14 IST2025-10-14T15:08:59+5:302025-10-14T15:14:57+5:30
Congress Vijay Wadettiwar News: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे, तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यात मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी, उद्वस्त झालेली घर आणि थंड पडलेले सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभे करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सरकार व्यस्त आहे,बैठका सुरू आहेत! तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्याना आता कोण विचारत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे!
दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अस सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे.. किमान हेक्टरी ५०,००० मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात तब्बल ४१,०६७ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. १४७ निवारा केंद्रे स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली आहेत. ७५ निवारा केंद्रे एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत.
बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 14, 2025
शेतकऱ्यांच्या डोळ्यांतलं पाणी, उद्वस्त झालेली घर आणि थंड पडलेलं सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.
सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं… pic.twitter.com/rs8yRxCISO