शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, शरद पवार यांनी राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करावी: अमित शहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 20:19 IST

केवळ राम मंदिर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपाने शांतता बाळगली आहे.

पुणे: अयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी भाजपा कटिबद्ध, वचनबद्ध आहे. केवळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे भाजपाने शांतता बाळगली आहे. मात्र, शरद पवार व काँग्रेस यांनी राम मंदिराबाबत आपआपली भूमिका स्पष्ट करावी.असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. पुणे, बारामती व शिरूर या लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांचे संमेलन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदीर येथे शनिवारी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे,, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष लक्ष्मण जगताप, संघटन मंत्री विजय पुराणिक यावेळी उपस्थित होते. यावेळी शहा बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत आहे त्याच ठिकाणी राम मंदिर होणार यात शंका नाही.  ममतांची सभा कोल्हापूरात लावली, देवगौडांची सभा पुण्यात घेतली. अखिलेशला धुळ्यात बोलावले तर कोणी त्यांना ऐकण्यासाठी येतील का? त्यांची चिंता करू नका, ते फक्त आपापल्या राज्यातच मोठे आहेत. भाजपा ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, नेत्यांची नाही. कार्यकर्ता हीच आपली ओळख आहे. ममतांचा पश्चिम बंगाल तसेच ओरिसा येथेही भाजपाच जिंकणार आहे. शहा म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा भ्रष्टाचार राज्याने पाहिला आहे. सार्वजनिक जीवनात कसे बोलावे याचाही विसर त्यांना सत्तेमुळे पडला होता. अजित पवार काय बोलले होते याची आठवण अजूनही राज्याला असेल. ७० हजार करोड रुपये खर्च करूनही त्यांना शेतीला पाणी देता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यापेक्षा कमी खर्चात व कमी वेळेत जलयुक्त शिवारचे कितीतरी चांगले काम केले.  

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAmit Shahअमित शहा